Kolhapur Lok Sabha Election 2024
Kolhapur Lok Sabha Election 2024Sarkarnama

Lok Sabha Result Live : दुसऱ्या फेरीअखेर मुश्रीफ घाटगेंनी राखले, राधानगरीतून के.पी पाटलांनी डाव पलटला? 

Kolhapur Lok Sabha Election 2024 Result : कोल्हापूर लोकसभेचा निकाल सायंकाळपर्यंत स्पष्ट होईल. आतापर्यंत दोन फेऱ्या पार पडल्या आहेत. दुसऱ्या फेरीअखेर शाहू महाराज छत्रपती हे जवळपास 12000 मतांनी आघाडीवर आहेत.

Kolhapur News : कोल्हापूर लोकसभेचा निकाल सायंकाळपर्यंत स्पष्ट होईल. आतापर्यंत दोन फेऱ्या पार पडल्या आहेत. दुसऱ्या फेरीअखेर शाहू महाराज छत्रपती हे जवळपास 12000 मतांनी  आघाडीवर आहेत. कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर,करवीर आणि राधानगरी मतदारसंघात शाहू महाराज यांची मुसंडी कायम आहे. तर महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक हे त्यांच्याच होमपेचवर कागल आणि चंदगड विधानसभा मतदारसंघात सुसाट आहेत.

राधानगरी मधून  शाहू महाराज छत्रपती यांना पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत  अनुक्रमे अडीच हजार ते साडेतीन हजाराचे मताधिक्य मिळाले आहे. या विधानसभा मतदारसंघात शिवसेने शिंदे गटाचे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर हे  संजय मंडलिक यांच्या प्रचारात होते. मात्र शाहू महाराज आणि राधानगरी यांचे जिव्हाळ्याचे संबंध दुसऱ्या फेरीपर्यंत तरी  राधानगरीकरांनी दाखवून दिले आहे. तर कागल आणि चंदगड विधानसभा मतदारसंघात  खासदार संजय मंडलिक यांना मताधिक्य मिळताना दिसत आहे. महायुतीचे नेते पालकमंत्री हसन मुश्रीफ शाहू ग्रुपचे अध्यक्ष भाजपचे नेते समर्जीत घाटगे यांची पकड या मतदारसंघावर दिसून येते.

केपी पाटलांनी डाव उलटला?

 राधानगरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश आबिटकर आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार के पी पाटील  यांच्यात विधानसभेची पारंपारिक लढत होते. कारखान्याच्या निवडणुकीनिमित्ताने  हे दोघे एकमेकांच्या विरोधात  शड्डू ठोकत असतात. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून  माजी आमदार के पी पाटील काय भूमिका घेतात? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. विद्यमान आमदार आणि माजी आमदार  महायुतीत असताना  पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत  सर्वाधिक मताधिक्य देणारा तालुका  हा राधानगरी ठरला आहे. त्यामुळे दुसऱ्या फेरीअखेर तरी  शाहू महाराज छत्रपती हे आघाडीवर आहेत. त्यामुळे हळूहळू निकाल स्पष्ट होईल. पण फेरीत मताधिक्य मिळत गेल्यास, माजी आमदार के पी पाटील यांनी घेतलेली भूमिका  काय होती. हे निकालानंतर स्पष्ट होईल.

कोल्हापूर लोकसभा मतमोजणी पहिली फेरी

चंदगड : 162 मताने शाहू महाराज आघाडीवर
राधानगरी : 2016 शाहू महाराज आघाडी
कागल : 848 मतांनी संजय मंडलिक आघाडीवर
दक्षिण : 1036 शाहू महाराज आघाडी
करवीर : शाहू महाराज 730 आघाडी
उत्तर : 3241 शाहू महाराज आघाडी

एकूण 6337 मतांनी शाहू छत्रपती पहिल्या फेरीत आघाडीवर

कोल्हापूर लोकसभा दुसरी फेरी

चंदगड : 718  शाहू महाराज मतांची आघाडी
राधानगरी : 2136 शाहू महाराज मतांची आघाडी
कागल :  1870 मतांचे संजय मंडलिक यांना मताधिक्य
दक्षिण : 250 मतांनी संजय मंडलिक यांना मताधिक्य  
करवीर : 2425 शाहू महाराज मतांची आघाडी
उत्तर : 2315 शाहू महाराज मतांची आघाडी

 दुसऱ्या फेरी अखेर शाहू महाराज 11811 मताने आघाडीवर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com