Sanjay Mandalik News : मंडलिकांसाठी दबाव वाढला, मुख्यमंत्री शिंदेंचा भाजप श्रेष्ठीकडे आग्रह

Kolhapur Lok Sabha Election 2024: शिंदे गटाच्या शिवसेनेच्या १३ जागांचा तेथे निर्णय होईल, असे विश्‍वसनीय वृत्त आहे. यासाठी आज मंडलिकांनी मुंबईत पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.
CM Eknath Shinde, Sanjay Mandlik
CM Eknath Shinde, Sanjay MandlikSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Political News : एकीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला असताना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात (Kolhapur Lok Sabha Election 2024) महायुतीच्या उमेदवाराबाबत पेच आहे. महायुतीत कोल्हापूरच्या जागेवर उमेदवार बदलाच्या हालचाली सुरू असल्याचे सांगितले जाते. शिवसेनेच्या फुटीनंतर उमेदवारीचा शब्द घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात गेलेल्या संजय मंडलिकांसाठी (Sanjay Mandalik)पुन्हा दबाव वाढला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार मंडलिक यांच्या उमेदवारीसाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे आग्रह धरून ठेवला आहे, अशी विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे. मंगळवारी खासदार मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन परिस्थितीची कल्पना दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवार-गुरुवार दोन दिवस दिल्लीत असणार आहेत. राज्यातील शिंदे गटाच्या शिवसेनेच्या १३ जागांचा तेथे निर्णय होईल, असे विश्‍वसनीय वृत्त आहे.

आज उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता

येत्या चोवीस (बुधवारी) तासांत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवार-गुरुवार दोन दिवस दिल्लीत असणार आहेत. राज्यातील शिंदे गटाच्या शिवसेनेच्या १३ जागांचा तेथे निर्णय होईल, असे विश्‍वसनीय वृत्त आहे. यासाठी आज मंडलिकांनी मुंबईत पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

CM Eknath Shinde, Sanjay Mandlik
Ajit Pawar News: आढळरावांना विरोध करणाऱ्या मोहितेंची समजूत काढण्यात अजितदादा यशस्वी होणार का?

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतील समाविष्ट काँग्रेसकडून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shrimant Shahu Chhatrapati) यांची उमेदवारी निश्‍चित झाली असताना महायुतीच्या उमेदवारीबाबत पेच निर्माण झाला आहे. जाणूनबुजून एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खासदार मंडलिक यांच्याबाबत नाराजी असल्याचे पसरवण्यात आल्याची सांगण्यात येते.

त्यामुळे महायुतीचा उमेदवार ठरेना अशी परिस्थिती आहे. उमेदवारीबाबतचा संभ्रम संपवण्यासाठी मंगळवारी विद्यमान खासदार आणि महायुतीचे संभाव्य उमेदवार संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत मागणी केली.

महायुतीतील राज्यातील भाजपने २० जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे. उर्वरित २८ जागांचा निर्णय झालेला नाही, त्यात कोल्हापूर व हातकणंगले या जिल्ह्यातील दोन जागांबद्दल पेच कायम आहे. या दोन्ही जागांवरील विद्यमान खासदार हे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्‍वाखालील शिवसेनेकडे आहेत. तथापि, दोन्ही खासदारांनाच उमेदवारी मिळेल का नाही? याविषयी उत्सुकता आहे. भाजपच्या (BJP) अंतर्गत सर्व्हेत या जागा धोक्यात असल्याने यावरील निर्णय लांबल्याचे बोलले जाते.

महाविकास आघाडीचा कोल्हापुरातील उमेदवार जाहीर होऊन त्यांनी प्रचारालाही सुरुवात केल्याने महायुतीतील संभाव्य उमेदवार प्रा. मंडलिक यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते, भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गटातील कार्यकर्त्यांत अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता लवकर संपावी, यासाठी मंडलिक मंगळवारी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली.

Edited by: Mangesh Mahale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com