Shahu Maharaj: शाहू महाराजांचा एकाचवेळी राज्य सरकार अन् जरांगेंना झटका; मराठा आरक्षणाबाबत धक्कादायक विधान,नव्या लढाईची घोषणा

Maratha Reservation News: कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी मराठा आरक्षण संदर्भात हैदराबाद गॅझेट लागू करण्याची सूचना दिलेल्या राज्य सरकारचे पितळ उघडे पाडले आहे.तसेच जरांगेंनाही झटका दिला आहे.
Shrimant Shahu Maharaj Warning On Maratha Reservation Agitation
Shrimant Shahu Maharaj Warning On Maratha Reservation Agitationsarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी मराठा आरक्षण संदर्भात हैदराबाद गॅझेट लागू करण्याची सूचना दिलेल्या राज्य सरकारचे पितळ उघडे पाडले आहे. तसेच त्यांनी यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनाही मोठा झटका दिला आहे. शाहू महाराज यांनी खंडेनवमीच्या पार्श्वभूमीवर आज करवीर गॅझेटची पूजा करत मराठा आरक्षणासंदर्भात नव्या लढायला सुरुवात केली आहे.

कोल्हापुरात बुधवारी (ता.1 ऑक्टोबर) खंडेनवमीच्या कार्यक्रमात शाहू महाराजांनी (Shahu Maharaj) एकाचवेळी राज्य सरकार आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना एकाचवेळी मोठा धक्का देणारं विधान केलं. त्यांनी ज्या निजामाला आपण तीनवेळा पराभूत केलं त्या निजामाच्या गॅजेटचा आपण आधार का घ्यावा? मराठा आरक्षणाची लढाई कोल्हापूरच्या गॅझेट लागू करण्यासाठी आता सुरुवात होईल अशी घोषणाच शाहू महाराज छत्रपती यांनी भवानी मंडपातून केली.

खासदार शाहू महाराज म्हणाले, आज वेगळ्या पद्धतीची खंडेनवमी आपण साजरी करतोय. परंपरेनुसार आज आपली शस्त्रपूजन करून करायची असतात. पण आपण गॅजेट्स, पेन पूजन खंडेनवमी साजरी करत आहोत. भारताने आता लोकशाही स्वीकारले आहे. त्याच रस्त्यावरून आपल्याला जायचं आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) संविधानाच्या चौकटीतूनच आपल्याला पुढे जावं लागेल. संविधान लवचिक आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत संविधानामध्ये जे अडथळे आहेत ते दूर करावे लागतील.हे अडथळे दूर केले तरच मराठा आरक्षणा चां प्रश्न सुटेल, अशी भूमिका शाहू महाराज यांनी मांडली.

Shrimant Shahu Maharaj Warning On Maratha Reservation Agitation
Modi Government News: मोदी सरकारची बिहार विधानसभा निवडणूक अन् दिवाळीच्या तोंडावर मोठी घोषणा; शेतकऱ्यांना थेट लाभ होणार

अनेक पातळ्यांवर तर मराठा हा मागासलेला आहे, हे आता सिद्ध झालं आहे. मराठा आणि कुणबी हे एकच आहेत हे मी गेले दोन वर्ष सांगत आलो आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना दुसऱ्या समाजावर अन्याय होणार नाही. याकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे. शाहू महाराजांनी काढलेल्या एका आदेशावर 96 टक्के बहुजनांना आरक्षणाचा लाभ मिळाला होता. मराठा समाजाला पुढे जायचं असेल तर आता समाजाने देखील स्वतःचे पाय मजबूत ठेवले पाहिजेत,असेही मत शाहू महाराज यांनी व्यक्त केलं.

शाहू महाराज यांनी आता आरक्षणातून नोकरीवर अवलंबून न राहता पुढे जाण्यासाठी इतर मार्ग देखील अवलंबले पाहिजेत,असंही म्हटलं. मराठा आरक्षणाच्या प्रश्नांमध्ये 1902 च्या आरक्षण आदेशाचा उल्लेख कुठेही होत नाही हे दुर्दैव आहे. हैदराबाद गॅझेट हे निजामाने केलेलं गॅझेट आहे. ज्या निजामाला आपण तीनवेळा हरवलं, त्या निजामाचं गॅझेट आपण का स्वीकारतोय हे मला कळत नसल्याचं परखड मतही त्यांनी मांडलं.

Shrimant Shahu Maharaj Warning On Maratha Reservation Agitation
ST Ticket Hike News : सरकारनामा इम्पॅक्ट! हंगामी 10 भाडेवाढीचा निर्णय एसटी महामंडळाकडून 24 तासांच्या आतच रद्द ; प्रवाशांना मोठा दिलासा

मराठा आरक्षणामध्ये अजून योग्य पर्याय आणि योग्य मार्ग निघालेला नाही. असे धक्कादायक विधान करत श्रीमंत शाहू महाराज यांनी कोल्हापूर गॅझेट लागू करण्याचा लढा आज पासून सुरू होतोय, अशी घोषणा केली. मराठा आरक्षणाच्या बाबतीत शासनाला दिशा देण्याचे काम आता कोल्हापूरकर करतील. हा लढा हळूहळू मोठा होत जाईल, असा इशारा यावेळी खासदार शाहू महाराज यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com