kolhapur Mahapalika: सतेज पाटलांनी कोल्हापूरमध्ये 'मनसे'ला शुन्यावर आणले : भाजपकडे निघालेला चेहरा काँग्रेसचा पुरस्कृत उमेदवार, पहिल्याच यादीत स्थान

Kolhapur Municipal Election: Congress Releases First Candidate List: ज्या जागांवर इच्छुकांची मागणी अधिक आहे त्या जागांवर बंडखोरांची धास्ती असल्याने पहिल्या यादीमध्ये अशा प्रभागातील उमेदवारांची नावे जाहीर न करण्याची खबरदारी काँग्रेसने घेतलेली दिसून येते.
Kolhapur Municipal Election: Congress Releases First Candidate List:
Kolhapur Municipal Election: Congress Releases First Candidate List:Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: कोल्हापूर महानगरपालिकेत मागील निवडणुकीत निवडून आलेले अपक्ष उमेदवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले अखेर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, आमदार सतेज पाटील यांच्या गळाला लागले आहेत. त्यामुळे कोल्हापूरमध्ये मनसे शुन्यावर आली आहे. काँग्रेसकडून त्यांना पुरस्कृत उमेदवारी देण्यात आली.

मागील काही दिवसांपासून राजू दिंडोर्ले भाजपच्या आणि काँग्रेसच्या संपर्कात होते. दोन्हीही पक्षाकडे त्यांनी पुरस्कृत उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती. प्रभाग क्रमांक 20 मधील सर्वसाधारण जागेवरून ते इच्छुक होते. मात्र महायुतीकडे सर्वसाधारण गटामधून शिवसेना या जागेचा दावा सोडत नसल्याने अखेर दिंडोर्ले हे आमदार सतेज पाटील यांच्यासोबत गेले.

कोल्हापूर महानगरपालिकेसाठी काँग्रेसकडून 48 उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी रात्री उशीरा जाहीर करण्यात आली. पहिल्या यादीमध्ये 48 उमेदवारांची नावे जाहीर केल्याने उर्वरित जागांची यादी येत्या दोन दिवसात जाहीर होणार असल्याने याकडे इच्छुकांच्या नजरा लागून राहिले आहेत.

Kolhapur Municipal Election: Congress Releases First Candidate List:
Congress BMC election : आघाडी तुटूनही काँग्रेस निभावणार छुपी मैत्री? मुंबईत ठाकरेंना फायदा होण्यासाठी व्यूहरचना

काँग्रेसकडून कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अडचणीच्या नसणाऱ्या प्रभागात उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र काँग्रेसच्या बालेकिल्ला असलेला प्रभाग क्रमांक 1, 3, 5, 7, 10 यासह अन्य काही मतदारसंघांमध्ये इच्छुकांची नावाची घोषणा केलेली नाही.

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडे सर्वाधिक उमेदवारीची मागणी करण्यात आली होती. जवळपास 350 हुन अधिक इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली होती. त्यामध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये 4 जागांसाठी तब्बल 40 इच्छुकांनी मागणी केली होती. मात्र ज्या जागांवर इच्छुकांची मागणी अधिक आहे त्या जागांवर बंडखोरांची धास्ती असल्याने पहिल्या यादीमध्ये अशा प्रभागातील उमेदवारांची नावे जाहीर न करण्याची खबरदारी काँग्रेसने घेतलेली दिसून येते.

Kolhapur Municipal Election: Congress Releases First Candidate List:
Kolhapur MahaPalika Nivadnuk : मोठी बातमी : कोल्हापूर महापालिकेसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर : तब्बल 48 नावांची सतेज पाटलांकडून घोषणा

काँग्रेसची यादी रात्री 10 वाजता जाहीर करण्यात येणार होती. मात्र अनेक मतदारसंघांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्षेप घेतल्याची चर्चा होती. शिवाय काही जागांबाबत कुणकुण लागल्याने नाराजी व्यक्त करत आक्रमक राहण्याची भूमिका घेतली होती. अखेर त्यावर तोडगा काढून काँग्रेसने 48 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. प्रभाग क्रमांक 4, 8, 12 आणि 20 या मतदारसंघातील सर्व उमेदवारांची घोषणा केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com