
कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी नवी प्रभाग रचना जाहीर झाली.
19 चार-सदस्यीय प्रभाग आणि 1 पाच-सदस्यीय प्रभाग असे 20 प्रभाग ठरले.
सदस्यसंख्या 81 कायम ठेवली आहे.
शिवाजी पेठ, शाहूपुरी, राजारामपुरीसह दाट लोकसंख्या असलेले भाग फुटले आहेत.
यामुळे अनेक नेत्यांचे राजकीय गणित बिघडले असून नवा संघर्ष निर्माण होणार आहे.
Kolhapur News : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी बहुचर्चित चार सदस्यीय प्रभाग रचनेचे प्रारूप आज जाहीर करण्यात आले. चार सदस्यांचे 19 प्रभाग, तर पाच सदस्यांचा एक असे 20 प्रभाग झाले आहेत. मात्र सदस्य संख्या 81 अशीच कायम ठेवली आहे. शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, जुना बुधवार पेठ, राजारामपुरी असे दाट लोकसंख्येचे आणि महत्त्वाचे परिसर फुटले आहेत. ज्या मतदारसंघात ज्या इच्छुकांचे पॉकेट आहे. तेच मतदार संघ काही ठिकाणी तुटले आहेत. ज्यांचे ज्या ठिकाणी हक्काचे मतदार आहेत. त्या ठिकाणी अनेकांच्या सोयीचा प्रभाग झाला आहे. त्यामुळे ज्या मतदार संघात पूर्वीपासून एकछत्री अंमल करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार आहे.
दरम्यान आता 15 सप्टेंबरपर्यंत या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतरच याला अंतिम स्वरूप येणार आहे. मात्र त्यापूर्वी कोल्हापूर महापालिकेच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा खेळ रंगणार आहे.
नव्या प्रभागामध्ये कमीतकमी 25 हजार, तर जास्तीतजास्त 37 हजार लोकसंख्या आहे. लोकसंख्येनुसार 81 सदस्य संख्येतील 21 सदस्य हे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील (ओबीसी) असतील. तर 11 सदस्य हे अनुसूचित जातीतील असतील. ओबीसींचे 21 सदस्य असल्याने प्रत्येक प्रभागात एक सदस्य येणारच असून एका प्रभागात दोन ओबीसी सदस्य असतील. फक्त हे दोन सदस्य पाच सदस्यीय प्रभागात जातात की चिठ्ठी टाकून केले जातात, हे आयोगाच्या सूचनेनुसार ठरणार आहे.
अनेक प्रभागांत अपेक्षित नसलेले काही भाग जोडले गेले, तर अनेक इच्छुकांना अपेक्षित नसलेल्या नव्या भागात मते मागण्यासाठी फिरावे लागणार आहे. प्रभाग रचनेच्या या अनपेक्षित धक्क्याने प्रस्थापित, मातब्बरांनाही विचार करायला लावले आहे. तसेच नव्या इच्छुकांना नव्या जोडण्या कराव्या लागणार आहेत. आता आरक्षणात काय घडणार आहे त्यावर पुढील विचार करण्याची वेळ अनेकांवर आली आहे. अशा स्थितीत इच्छुक व पक्षांच्या ताकदीचा कस लागणार आहे.
घाई घाईने घेतलेला पक्षप्रवेशाचा निर्णय आता अनेकांना चुकीचा वाटत आहे. तर काहीजणांनी प्रभाग रचनेनंतरच पक्षप्रवेशचा निर्णय घेतलेला आहे. यापूर्वी पक्षप्रवेश केलेल्या इच्छुकांना मात्र या प्रभाग रचनेमुळे काही अंशी फटका बसलेला प्रथमदर्शनी दिसतो. त्यामुळे असे पक्षप्रवेश केलेल्या इच्छुकांमध्ये खळबळ माजली आहे. तर अनेकांनी अंतिम प्रभाग रचनेनंतरच पक्ष प्रवेशाचा निर्णय राखून ठेवला आहे.
काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांचा शहरातील मध्यवस्तीचा भाग दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काही भाग जोडला गेला आहे. तर त्यांचा मतदारसंघ शिवाजी पेठेतून थेट मंगळवार पेठ इथपर्यंत गेला आहे. त्यामुळे त्यांच्या समोरील अडचणी देखील वाढणार आहेत. काँग्रेसचे राजेश लाटकर यांच्यासाठी कठीण आहे. तर महायुतीत असणारे आदिल फरास, ऋतुराज क्षीरसागर, शारंगधर देशमुख यांच्यासाठी सोयीचा मतदार संघ झाला आहे. सर्वाधिक प्रभाग क्रमांक चार, अकरा, नऊ, सात, बारा अधिक चर्चेत आहेत.
प्रश्न 1: कोल्हापूर महापालिकेत एकूण किती प्रभाग झाले?
➡️ 20 प्रभाग झाले – 19 चार-सदस्यीय आणि 1 पाच-सदस्यीय.
प्रश्न 2: सदस्यसंख्या किती आहे?
➡️ 81 सदस्यांची संख्या कायम आहे.
प्रश्न 3: कोणते महत्त्वाचे भाग फुटले आहेत?
➡️ शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, बुधवार पेठ, राजारामपुरी.
प्रश्न 4: या रचनेचा परिणाम कोणावर होणार?
➡️ ज्या नेत्यांचे हक्काचे मतदारसंघ आहेत ते विभागले गेल्याने त्यांच्यावर परिणाम होणार.
प्रश्न 5: या प्रभागरचनेमुळे काय होणार?
➡️ नेत्यांचे गणित बिघडून नवा संघर्ष उभा राहील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.