MNS Kolhapur: मनसेच्या कोल्हापूरच्या जिल्हाप्रमुखाची पावले भाजपकडे? अटीशर्तीमुळे निर्णय लांबणीवर

MNS Leader Raju Dindorle Will Joins BJP: महायुती म्हणून निवडणूक लढवण्यास झाल्यास प्रभागातील भक्कम विजयाचा दावेदार म्हणून दिंडोर्ले यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे त्यांना महायुती मधील भाजपमध्ये घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
MNS Leader Raju Dindorle Will Joins BJP
MNS Leader Raju Dindorle Will Joins BJPSakal
Published on
Updated on

Kolhapur News: आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या या ना त्या पक्षात कोलांटउड्या सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीने मोर्चा वळवला आहे.

आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव नगरसेवक आणि एकमेव जिल्हाध्यक्ष भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र त्याला अद्याप कोणी दुजोरा दिलेला नाही. सुरुवातीला प्राथमिक स्तरावर चर्चा झाली आहे. काही नियम आणि अटीशर्तीमुळे हा निर्णय लांबला असल्याचे सांगितले जात आहे.

कोल्हापूर महानगरपालिका आणि कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव नगरसेवक होऊन गेले आहेत. नव्या प्रभाग रचनेनुसार प्रभाग क्रमांक 20 मधून निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. भाजपकडून त्यांच्याबाबत चाचपणी करण्यात आली.

महायुती म्हणून निवडणूक लढवण्यास झाल्यास प्रभागातील भक्कम विजयाचा दावेदार म्हणून दिंडोर्ले यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे त्यांना महायुती मधील भाजपमध्ये घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

MNS Leader Raju Dindorle Will Joins BJP
Eknath Shinde: महायुतीत एकनाथ शिंदे नाराज? पुढील काळ कसा असेल लाभदायक

प्राथमिक स्तरावर याबाबत भाजपच्या गोटातच चर्चा झाल्याची देखील माहिती समोर आली आहे. मात्र पक्षप्रवेश केल्यानंतर विजयाची खात्री आणि जबाबदारी कोण घेणार? शिवाय उमेदवारी मिळणार का? मनसेचे जिल्हाप्रमुख पद सोडून येत असताना पक्षात कोणती नवी जबाबदारी मिळणार? या काही प्रमुख अटी देखील समोर ठेवल्याचे सांगितले जाते. मात्र भाजप आणि मनसेच्या कोणत्याच पदाधिकाऱ्यांकडून याबाबत अधिकृत भाष्य केले जात नाही.

दरम्यान याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक राजू दिंडोर्ले यांच्याशी संपर्क साधला असता, पण कोणत्याच पक्षात प्रवेश करणार नसून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे देखील 'सरकारनामा'शी बोलताना स्पष्ट केले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com