Eknath Shinde: महायुतीत एकनाथ शिंदे नाराज? पुढील काळ कसा असेल लाभदायक

Astrologer Siddheshwar Martkar predicts a bright future for Deputy CM Eknath Shinde:जून २०२६नंतरचा काळ त्यांच्यासाठी सन्मानजनक राहू शकतो. पत्रिकेत शनी-मंगळ बलवान असल्यामुळे पक्ष-चिन्हाच्या कायदेशीर लढाईत त्यांना दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे.
Astrologer Siddheshwar Martkar predicts a bright future for Deputy CM Eknath
Astrologer Siddheshwar Martkar predicts a bright future for Deputy CM Eknath Sarkarnama
Published on
Updated on

महायुतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची अनेक दिवसापासून चर्चां आहे. पालकमंत्रिपदावरून महायुतीत नाराजी नाट्य रंगलंय होतं. रायगड आणि नाशिकचे पालकमंत्री जाहीर झाले नसले तरी ध्वजारोहणाचा मान मात्र अजितदादांची राष्ट्रवादी आणि भाजपच्या मंत्र्यांना मिळालाय़. त्यामुळेच की का उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह रायगडचे भरत गोगावले आणि नाशिकचे दादा भुसे यांनी थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीलाच दांडी मारली. आणि त्यामुळे शिंदेंच्या नाराजीची चर्चा रंगली. शिंदे हे नाराज आहेत का? हे जाणून घेऊयात!

२०१२ ते २०३० हा काळ त्यांच्या राजकीय यशासाठी महत्त्वपूर्ण असून, या काळात त्यांचा राजकारणातील प्रभाव कायम राहू शकतो. सध्या धनू राशीच्या चतुर्थ स्थानातून शनीचे भ्रमण सुरू असल्यामुळे त्यांच्या नाराजीविषयी चर्चा सुरू आहे. मात्र, १८ ऑक्टोबर ते पाच डिसेंबर कर्क राशीतील गुरूचे भ्रमण त्यांच्यासाठी लाभदायक राहू शकते.

विशेषत: जून २०२६नंतरचा काळ त्यांच्यासाठी सन्मानजनक राहू शकतो. पत्रिकेत शनी-मंगळ बलवान असल्यामुळे पक्ष-चिन्हाच्या कायदेशीर लढाईत त्यांना दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे. २०३०पर्यंत राहू महादशा सुरू असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता असून, पक्षाचे सत्तेतील स्थान कायम राहील, असे पुण्यातील ज्योतिष सिद्धेश्वर मारटकर यांनी 'सरकारनामा'ला सांगितले.

मारटकर म्हणाले, "एकनाथ शिंदे यांच्या पत्रिकेत रवी-मंगळ युती व उच्च राशीतील मंगळ, शुक्र; तसेच स्वराशीतील गुरू-शनी या बलवान ग्रहयोगामुळे सामान्य कार्यकर्ता ते मुख्यमंत्री अशी आश्चर्यकारक वाटचाल अनुभवास आली आहे. धनू राशीत चंद्र-केतू असून, मूळ नक्षत्र असल्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बंड करण्यात यश आले आहे. मात्र, दशमातील नेपच्युनमुळे अनेक आरोपांना तोंड द्यावे लागले आहे. मकर राशीत रवी असल्यामुळे खडतर सुनावणीनंतर सामान्य स्थितीमधून अधिकार प्राप्त झाला आहे. या रवीमुळे तळागाळातील लोकांपर्यंत दांडगा जनसंपर्क लाभला आहे. रवी-मंगळासारखा अधिकार योग निर्माण झाला आहे. या योगामुळे पक्षप्रमुख म्हणून सहकारी आमदार-खासदारांनी त्यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. या योगामुळे केंद्रातील भाजपच्या वरिष्ठांशी चांगले संबंध व समर्थन मिळाले आहे,"

Astrologer Siddheshwar Martkar predicts a bright future for Deputy CM Eknath
Shankar Mandekar: 'शोले'मुळे जिद्दीने संघर्ष करण्याची उर्मी; जनसेवेत गुंतल्याने आजाराला संधीच नाही

अतिवृष्टी-वादळांचा धोका कायम

२२ सप्टेंबरच्या अमांत कुंडलीमध्ये कर्क लग्न उदित असून, तृतीय स्थानी अमावस्या होत आहे. प्रतियोगात शनी, नेपच्यून भाग्यस्थानी असून, व्ययस्थानी गुरू आहे. धनस्थानी शुक्र-केतू, अष्टमात राहू व चतुर्थात मंगळ अशी ग्रहस्थिती आहे.

रवी-चंद्राच्या प्रतियोगात शनी, नेपच्यून असल्यामुळे या काळात मोठी पर्जन्यवृष्टी होईल. विशेषतः उत्तर भारत व विदर्भ-मराठवाडा या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता राहील. अमावस्येनंतर उष्णतेमध्ये वाढ होण्याची शक्यता असून, वादळे-भूकंपासारख्या घटनांमधून हानी संभवते. पुढील काळात काही संसर्गजन्य विकार पसरण्याची शक्यता वाटते. मुंबईसह कोकण व पश्चिम किनारपट्टीवर अतिवृष्टी किंवा वादळाचा धोका संभवतो.

Astrologer Siddheshwar Martkar predicts a bright future for Deputy CM Eknath
Maharashtra Government: नऊ लाख कोटींचं कर्ज, मंत्र्यांचा ऐशआराम? आमदारांच्या दिमतीला लक्झरी कार, कोट्यवधीची उधळपट्टी

या योगामुळे राजकीय, सामाजिक क्षेत्रात मोठा गोंधळ किंवा नाट्यमय घटना संभवतात. मराठा-ओबीसी आरक्षणावरून मोठे वादविवाद कायम राहतील. वादग्रस्त विधानांमुळे मोठे नेते अडचणीत येतील. धार्मिक व जातीय प्रश्नांवर आरोप-प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात अनुभवास येतील. दसरा मेळावे वादग्रस्त वक्तव्ये आणि वाक् युद्धाने गाजतील. या मेळाव्यांच्या निमित्ताने शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये मोठा संघर्ष अनुभवास येईल. रवी-शनी प्रतियोगामुळे राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तीच्या मृत्यूची घटना या काळात संभवते.

मंगळ-प्लुटो केंद्रयोगामुळे मोठे बंड, बंद, हिंसाचार, निदर्शने या काळात संभवतात. काही देशात अराजक तीव्र हिंसाचार, आंदोलने होतील. काही देश युद्धाच्या तयारीत दिसतील. या काळात दहशतवादी, माओवादी कारवाया भडकण्याची शक्यता असून, मोठे दहशतवादी-गुन्हेगार मारले जातील. महत्त्वाच्या शहरात टोळीयुद्ध, गुन्हेगारीमध्ये वाढ झालेली दिसेल.

सातारा येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाची जोरदार तयारी दिसेल. मात्र, काही निर्णयावरून साहित्यिकांमधील मतभेद चव्हाट्यावर येतील. काही राजकीय व्यक्तींना कायदेशीर कटकटींचा सामना करावा लागेल. मोठ्या नेत्यांच्या परदेश दौऱ्यावरून टीका होईल. या योगामुळे शेअर मार्केटमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण होऊन मोठे करेक्शन येईल आणि निर्देशांकात घसरण होईल. सोन्या-चांदीच्या भावात घट होण्याची शक्यता राहील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com