Hasan Mushrif : उद्धव ठाकरेंचा गौरव महायुतीमधील राष्ट्रवादी करणार; मंत्री मुश्रीफांनी सांगितलं नेमकं कारण

Maharashtra Minister Hasan Mushrif Amrut Kalash Yatra Kolhapur Mumbai Shiv Sena chief Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा गौरव महायुतीमधील अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस करणार आहे.
Hasan Mushrif
Hasan MushrifSarkarnama
Published on
Updated on

Amrut Kalash Yatra : कोल्हापूर विभागातून आज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा उपस्थितीत अमृत कलश यात्रेला सुरुवात झाली. सर्व विभागातून अमृत कलश यात्रा एकत्र आल्यानंतर मुंबई येथे शोभायात्रा निघणार आहे. या शोभायात्रात विविध मान्यवरांसह पुरस्काराने सन्मानित झालेल्या आणि हयात असलेल्या मान्यवरांचा सत्कार होणार आहे.

दरम्यान आज पर्यंत झालेल्या मुख्यमंत्र्यांचे देखील गौरव या शोभा यात्रेत होणार आहे. यानिमित्ताने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देखील गौरव महायुतीमधील अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस करणार आहे. मात्र या सोहळ्याला उद्धव ठाकरे उपस्थिती लावणार का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक किल्ले पन्हाळगडावरून आज अमृत कलश यात्रेला सुरुवात करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचं आदर्श राज्य होतं, म्हणूनच त्यांचं आज आदराने आणि आदर्श पूर्वक नाव घेतले जाते. त्यामुळेच त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले पन्हाळगडावरून माती घेऊन त्यांच्यासारखे आदर्श राज्य घडवण्यासाठी अमृत कलश यात्रेला येथून सुरुवात केली आहे. पाऊस असून देखील जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून राष्ट्रवादीचे (NCP) कार्यकर्ते या ठिकाणी आले त्यांचे आभार मानत मुश्रीफांनी ऋण व्यक्त केले.

Hasan Mushrif
Shirdi BJP Meeting : भाजप मंडलाध्यक्ष नियुक्त्या नियम डावलून? जिल्हाध्यक्ष पदासाठी शिंदे अन् विखे गटात कुरघोड्या; कार्याध्यक्ष चव्हाण शिर्डीत दाखल

आज कोल्हापुरातून (Kolhapur) सुरुवात झालेली ही यात्रा सांगली सातारा, पुणे या ठिकाणी जाणार आहे. संपूर्ण विभागातून ही अमृत कलश यात्रा एक तारखेला एकत्र होऊन शोभा यात्रा होणार आहे. या दिवशी ज्यांना भारतरत्न मिळाला आहे, ज्यांना साहित्यरत्न पुरस्कार मिळाला आहे, आजपर्यंत जे मुख्यमंत्री झाले, जे हयात आहेत अशांचा सत्कार-गौरव या ठिकाणी होणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

Hasan Mushrif
Pakistanis in Maharashtra : महाराष्ट्रात तब्बल 18 हजार पाकिस्तानी, पुण्यात 100 तर मुंबईत आठ हजार...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवरून बोलताना या यात्रानिमित्त कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आला, हा उत्साह असेल तरच निवडणूक जिंकता येते, असे सांगत पहलगाम घटनेचा निषेध व्यक्त केला. जम्मू काश्मीरमधील घटना निषेधार्थ आहे. पूर्ण देशवासियांना चीड आणि संताप आणणारी आहे. दहशतवादी कृत्याचा मी निषेध करतो. असा बदला घेऊ, असा सूड घेऊ, जगाला आठवण राहील, असा इशारा पंतप्रधान मोदींनी दिला आहे. संपूर्ण देश पंतप्रधान मोदी यांच्याशी पाठीशी आहे. संपूर्ण भारत एकजुटीने समर्थन करेल, असेही मंत्री मुश्रीफ म्हणाले.

महायुतीमधील गिरीश महाजन यांच्यावर जम्मू-काश्मीरमधील जबाबदारी देण्यात. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील त्या ठिकाणी गेले. शिंदे यांचा स्वभावच आहे, काही घटना घडली की ते तात्काळ तिथे जातात. त्यामुळे महायुतीमध्ये कुरघोडी वगैरे काही नाही, असे सांगत पहलगाम घटनेवरून टीकाकारांना उत्तर दिले आहे. छोट्या-मोठ्या गोष्टीकडे लक्ष देऊन राजकारण करू नये. देशवासियांचे जे कर्तव्य आहे ते केलेच पाहिजे. ज्या हरामखोराने हे केला आहे, त्याला शिक्षा होण्यासाठी सर्वांनी पुढे यायला पाहिजे, असे आवाहन देखील वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com