Ajit Pawar: बंटी पाटलांच्या लोकसभेतील भूमिकेवर अजितदादांना प्रश्न, पी. एन.पाटलांचंही नाव घेतलं!

Ajit Pawar on Satej Patil Lok sabha Election: दिवंगत आमदार पी एन पाटील यांनी शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारात कोणती भूमिका घेतली. याबाबत देखील चर्चा करण्यात आली. लोकसभा निवडणुकीतील आठवणींना उजाळा दिला.
ajit pawar news
ajit pawar newsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: उपमुख्यमंत्री अजितपवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. आज सकाळी कोल्हापूर विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांनी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी केली. त्यानंतर दिवंगत आमदार पी एन पाटील यांच्या घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली.

पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील उपस्थित होते. या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुटुंबीयांशी चर्चा करत असताना लोकसभा निवडणुकीतील आठवणींना उजाळा दिला.

दिवंगत आमदार पी एन पाटील यांनी शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारात कोणती भूमिका घेतली. याबाबत देखील चर्चा करण्यात आली. यावेळी अजित पवार यांनी पी एन पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांचे सांत्वन केले.

ajit pawar news
Maharashtra Politics: महायुतीत खलबतं; मंत्रिपदाची आस लावून बसलेल्या नेत्यांची महामंडाळावर वर्णी ?

यावेळी लोकसभा प्रचाराच्या मुद्यावर देखील चर्चा झाली.पी एन साहेब यांनी वयोमानानुसार जेवढा झेपेल तेवढा प्रचार करायला हवा होता, असे म्हणताच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शाहू महाराज आणि पी. एन. पाटील यांच्या मैत्रीबद्दल सांगितले. त्यानंतर अजित पवार यांनी शाहू महाराजांच्या खासदारकीसाठी बंटींनी की पी. एन. साहेबांनी जास्त इंटरेस्ट दाखवला असा प्रश्न केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com