Keshavrao Bhosale Theater Fire: केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री शिंदेकडून १० कोटी

Keshavrao Bhosale Natyagruha Fire : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह वास्तूची बांधणी स्वतः छत्रपती शाहू महाराजांच्या पुढाकारानेच झाली. या वास्तूत संगीत, नाट्य कलेची बीजेदेखील रुजली गेली.
Keshavrao Bhosale Theater Fire
Keshavrao Bhosale Theater FireSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर आणि कोल्हापुरातील कलाकारांचा आत्मा असणारा आणि पैलवानांचा हक्काचं मैदान असणार खासबाग मैदान आणि संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह (Keshavrao Bhosale Theater Fire) काल रात्री आगीत भस्मसात झाले. त्यामुळे कोल्हापुरच्या सांस्कृतिक ठेवा असणारा कलामंच आगीच्या भस्मस्थानी जळताना कोल्हापूरकरांना अश्रू अनावर झाले.

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह वास्तूची बांधणी स्वतः छत्रपती शाहू महाराजांच्या पुढाकारानेच झाली. या वास्तूत संगीत, नाट्य कलेची बीजेदेखील रुजली गेली. आज अचानक लागलेल्या आगीने कोल्हापूरची अस्मिता आगीच्या खाईत लोटलेली पाहणे दुर्दैवी आहे. पण या वास्तूच्या पुन:उभारणी साठी तात्काळ १० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.

आमदार सतेज पाटील, अजून नियोजन मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार अमल महाडिक यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत आवश्यक सूचना उपस्थित जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्यासह प्रशासनास दिल्या. राजेश क्षीरसागर यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी तात्काळ टर्न टेबल लॅडर, विमानतळ प्रशासनाचे अग्निशमन वाहन पाचारण करून रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ही आग आटोक्यात आणली.

घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी परिस्थिती आणि वस्तुस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला असल्याची माहिती राजेश क्षीरसागर यांनी दिली. संपूर्ण नुकसानीची माहिती घेता अंदाजे ५० कोटींचे नुकसान झाल्याचे दिसते. सरकारकडून १० कोटींची मदत तात्काळ मंजूर करण्यात आली आहे, असे क्षीरसागर यांनी सांगितले.

Keshavrao Bhosale Theater Fire
Gulabrao Deokar: गुलाबराव, मी भाजपला मदत केली असेल तर सिद्ध करा, राजकारणातून संन्यास घेईल; देवकरांचे आवाहन

अचानक लागलेल्या आगीने ऐतिहासिक वास्तू डोळ्यासमोर जळणे ही गोष्ट दुर्दैवी आहे. सरकार या वास्तूच्या पुनः उभारणीसाठी आवश्यक सर्व ती मदत करेल. यासह कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी यांनी आपल्या आमदार, खासदार फंडातून निधी देवून कोल्हापूरची अस्मिता पुन्हा उभी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com