Shaktipeeth Highway: खोटी बिले दाखवून आमदारानं लाटले ८६ लाख रुपये? आता 'शक्तिपीठ' मध्ये 'मलई' चाखणार...; राजू शेट्टींचा घणाघात

Raju Shetti Allegations on Rajesh Kshirsagar over Shaktipeeth Highway: दोन दिवसापुर्वी आमदार राजेश क्षीरसागर यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ मुंबईत बैठकीत घेतली. या बैठकीत ३५ लोकांनी सात बारासरकारकडे जमीन संपादनास दिले असल्याचे सांगण्यात आले आहे.
Raju Shetti
Raju ShettiSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: आमदार राजेश क्षीरसागर यांनी खोटी वैद्यकीय बिले दाखवून ८६ लाख रूपयांची सरकारची फसवणूक केली. तेच राजेश क्षीरसागर आता शक्तीपीठ महामार्गात बोगस शेतकरी दाखवून ५० हजार कोटीत ढपल्यामध्ये हिस्सा घेण्यासाठी खटाटोप करीत आहेत, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर केला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील १ हजार शेतक-यांनी शक्तीपीठ महामार्गास मंजूरी दिली असल्याचा कांगावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. यामध्ये त्यांचा ढोंगीपणा समोर आला आहे. मुंबईत दोन दिवसापुर्वी झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील ३५ शेतक-यांनीच सात बारा दिले असून १ टक्काही लोकांचे शक्तीपीठ महामार्गास समर्थन नसल्याचे दिसून आली असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघचनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली.

दोन दिवसापुर्वी आमदार राजेश क्षीरसागर यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ मुंबईत बैठकीत घेतली. या बैठकीत ३५ लोकांनी सात बारासरकारकडे जमीन संपादनास दिले असल्याचे सांगण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एकुण ३८२२ गटधारकांची जवळपास ५३०० एकर संपादित केली जाणार असून या गटामध्ये १० हजार हून अधिक शेतकरी समाविष्ट आहेत.

यामुळे गटधारकांच्या १ टक्काही लोकांचे या महामार्गास सम्मती नसल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. यामुळे राज्य सरकार शक्तीपीठ समर्थनासाठी जो खटाटोप करीत आहेत. त्यामध्ये ते अपयशी ठरले आहेत. ज्यापध्दतीने कोल्हापूरची करवीर निवासनी अंबाबाई देवीने कोल्हासुर नावाच्या राक्षसाचा वध केला आता कोल्हापुर शहरातील जनतेला पुराच्या खाईत लोटणा-या शक्तीपीठ महामार्ग रूपी राक्षसापासून कोल्हापूरच्या जनतेचे रक्षण आई अंबाबाईच करेल, असेही शेट्टी म्हणाले .

Raju Shetti
Kolhapur: निवडणुकांच्या तोंडावर BLACK MAGIC; महापालिकेत मंतरलेला लिंबू अन् राखेचं रिंगण ; प्रशासनाला धास्ती

कॅाग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी गेल्या अधिवेशनात समर्थन करणा-या शेतक-यांची यादी मागितली गत आठवड्यात याबाबत लेखी पत्र सुध्दा दिले. मग हि माहिती त्यांना ती आज अखेर देण्यात आली नाही. जमीनीच्या मोबदल्यासंदर्भात राज्य सरकारचा कोणताही निर्णय स्पष्ट झालेला नाही. यामुळे राज्याचे मुख्यमंत्री कोणतीही गोष्ट रेटून व लादून करण्याचा प्रयत्न करत आहेत.दोन दिवसापुर्वी झालेल्या बैठकीत माणगाव गावातील ६ लोक घेऊन गेले होते. मात्र त्यातील ३ लोकांचीच जमीन संपादित केली जाणार आहे. उर्वरीत तीन लोक भुजगावणे म्हणूनच घेऊन गेले होते.

कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गामुळे महापूर , सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व वन विभागातील इको सेन्सिटीव्ह झोनमध्ये होणारी पर्यावरणाची हाणी , क्षारपड जमीनीची समस्या , शहरी व ग्रामीण भागातील वाढीव पुरबाधित भागातील गोरगरीब लोकांचे होणारे नुकसान , महामार्गाच्या दोन्ही बाजूस संरक्षित भिंत असल्याने गावाचे -शेतीचे व वाडी वस्तीचे होणारे विभाजन, उस उत्पादनात घट झाल्याने भविष्यात साखर कारखानदारी व ऊस उत्पादक शेतक-यांचे होणारे नुकसान याबाबत मुख्यमंत्र्यांनी भ्र शब्द काढण्यास तयार नसल्याची माहिती शेट्टी यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com