kolhapur Politics: के.पी. नव्हे तर राष्ट्रवादीच्या लीडरवर ए. वाय. पाटलांचा वार, कागलमधूनचं...

Vedaganga Dudhganga Cooperative Sugar Factory: तालुक्याच्या अस्मितेसाठी विधानसभा निवडणूक लढवून आमदार होणारच,’ असा विश्वास ए. वाय. पाटील यांनी व्यक्त केला.
Vedaganga Dudhganga Cooperative Sugar Factory news
Vedaganga Dudhganga Cooperative Sugar Factory newsSarkarnama
Published on
Updated on

kolhapur: वेदगंगा दूधगंगा सहकारी साखर कारखाना अर्थात बिद्री निवडणुकीच्या निमित्ताने मेहुण्या पाहुण्यांच्या वादाने तोंड फुटले होते. माजी आमदार के. पी. पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यात दुफळी निर्माण झाली. अशातच जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते हसन मुश्रीफ यांनी माजी आमदार के. पी. पाटील यांची साथ दिली. त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी माजी आमदार के. पी. पाटील यांच्यावर निशाणा साधन्याऐवजी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते मुश्रीफ यांच्यावरच तोफ टागली आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षाचे काम निष्ठेने सांभाळले. माझ्या राजकीय यशात स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी बळ दिले. मात्र, मला राजकारणातून मोडण्याचा घाट व्हाया कागल आहे, मुदाळ नाही हे उशिरा लक्षात आले. त्यामुळे आता सावध राहावे लागेल’, असा आरोप पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केला. ते सोळांकुर (ता. राधानगरी) येथे दूधगंगा खोऱ्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते के. डी. चौगले होते. ए. वाय. पाटील म्हणाले, ‘२०१९ ला निवडणूक लढवू नये याचा विडा सोडून जाणाऱ्या कार्यकर्त्यांनी घेतला. सत्तेशिवाय ते राहू शकत नाहीत. त्यांना सहकारी संस्थांमध्ये संधी दिली. त्यांनी मला फसविण्याचा प्रयत्न केला; परंतु तुम्ही ज्याची संगत केली ते तुम्हाला फसवणार आहेत.

‘भोगावती’चे उपाध्यक्ष राजू कवडे म्हणाले, ‘स्वार्थ साधणारे गटातून गेले आहेत. गत विधानसभा निवडणुकीत ए. वाय. ना रोखण्याचा प्रयत्न झाला; परंतु या वेळी विधानसभा लढविण्याचा निर्धार करून राधानगरीचा आमदार करूया.’

Vedaganga Dudhganga Cooperative Sugar Factory news
PM Modi: मोदींची भाषणं ऐका आता प्रादेशिक भाषेत; निवडणुकीच्या रणधुमाळीत AIची एन्ट्री

या प्रसंगी बाजार समितीचे संचालक शिवाजी पाटील, संभाजी देसाई, बी. एस. पाटील, प्रकाश पोवार, प्रभाकर पाटील, नामदेव मुसळे यांची भाषणे झाली. या वेळी मानसिंग पाटील, आप्पा आबदार, ए. एल. पाटील, बबन जाधव, वाय. डी. पाटील, शिवाजी पाटील, भगवान पातले, आर. डी. साठे, यु. डी. पाटील, सुरेश पाटील उपस्थित होते.

आता माघार नाही....

‘गटातील लोकांना खेचण्यासाठी नोकरीची आमिषे देत आहेत. पण, २७ वर्षे बिद्रीत भरती केली नाही. आगामी निवडणुकीत मला मोडणाऱ्यांना मोडणारच व राधानगरीचा स्वामिभान दाखविणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत फॉर्म भरणार, माघार घेणार नाही. तालुक्याच्या अस्मितेसाठी विधानसभा निवडणूक लढवून आमदार होणारच,’ असा विश्वास ए. वाय. पाटील यांनी व्यक्त केला.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com