Kolhapur politics : सतेज पाटलांचा संताप अन् शाहू महाराजांच्या खासदारकीचा राजीनामा? महाडिकांनी अचूक टाईमिंग साधलं!

Dhananjay Mahadik On Satej Patil : मधुरिमाराजे यांनी माघार घेतल्यानंतर सतेज पाटलांचा संताप मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाला. पाटील यांनी अर्ज माघारीनंतर शाहू छत्रपतींना उद्देश केलेली वक्तव्य सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यावरून आता भाजपाचे नेते धनंजय महाडिक यांनी सतेज पाटलांवर टीका केली आहे.
Dhananjay Mahadik, Madhurimaraje Chhatrapati, Shahu Maharaj Chhatrapati, Dhanajay Mahadik
Dhananjay Mahadik, Madhurimaraje Chhatrapati, Shahu Maharaj Chhatrapati, Dhanajay MahadikSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 05 Nov : सध्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची (Kolhapur North Constituency) चर्चा राज्यभरात सुरू आहे. आधी राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर अंतर्गत विरोधामुळे त्यांना डावलून मधुरिमाराजे छत्रपती (Madhurimaraje Chhatrapati) यांना उमेदवारी देण्यात आली.

अशातच काल मधुरिमाराजे यांनी ऐनवेळी माघार घेतली अशा अनेक नाट्यमय घडामोड या मतदारसंघात घडल्या. मात्र, मधुरिमाराजे यांची माघार काँग्रेसचे नेते सतेज पाटील (Satej Patil) यांच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचं पाहायल मिळथ आहे. त्यामुळे या निर्णयावर त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

शाहू महाराजांनी आणि मधुरिमाराजे यांनी आपली फसवणूक केल्याचं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मधुरिमाराजे यांनी माघार घेतल्यानंतर सतेज पाटलांचा (Satej Patil) संताप मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाला. संतप्त पाटील यांनी अर्ज माघारीनंतर मधुरिमाराजे आणि शाहू छत्रपतींना उद्देश केलेली वक्तव्य सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

यावरून आता भाजपाचे नेते धनंजय महाडिक यांनी शाहू महाराजांचा आणि कोल्हापुरातील राजघराण्याचा अवमान सतेज पाटलांनी केल्याचं म्हटलं आहे. माध्यमांशी बोलताना धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) म्हणाले, "शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार असल्याची माहिती मला सोशल मीडियाद्वारे समजली. त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला असेल तर त्यात आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही.

Dhananjay Mahadik, Madhurimaraje Chhatrapati, Shahu Maharaj Chhatrapati, Dhanajay Mahadik
Maharashtra Assembly Elections 2024 LIVE updates : मी जेलमध्ये जायला तयार- मुख्यमंत्री शिंदे

कारण ज्या पद्धतीने शाहू महाराजांचा अवमान झाला तो कोणीही सहन करु शकणार नाही. आजपर्यंत कोणीही कोल्हापूरच्या राजघरण्याविषयी अशी वक्तव्यं करण्याचं धाडस केलं नव्हतं. पण सतेज पाटील स्वत:ला सर्वोच्च समजतात. त्यामुळे त्यांनी महाराज आणि त्यांच्या कुटुंबियांविषयी अर्वाच्य भाषेत वक्तव्य केली आहेत. त्यामुळे महाराजांचं मन दुखावलं असेल हे सर्व वेदनादायी असून कोल्हापूरची जनता हे अजिबात सहन करणार नाही."

Dhananjay Mahadik, Madhurimaraje Chhatrapati, Shahu Maharaj Chhatrapati, Dhanajay Mahadik
Kolhapur Politics : ते घडलं नव्हतं घडवलं होतं? शाहूंना अंदाज आला, पाटलांचा स्व‍कीयांनी घात केला

ज्या महाराजांसाठी 6 महिन्यांपूर्वी गादीचा मान, गादीचा मान सांगत मतं मागत होते. आज त्याच महाराजांना ते बोलत होते. सतेज पाटील एवढे मोठे झाले का? की ते राजघराण्यावर बोलायला लागले, असा सवाल महाडिकांनी केला. शिवाय जे कोल्हापूर उत्तरमध्ये घडलं त्याचा परिणाम जिल्ह्यातील पाचही जागांवर दिसून येईल. या सर्व जागांवर काँग्रेसचा सुपडा साफ होऊन भाजप एकतर्फी विजयी होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com