Kolhapur Politics: तिसरी यादी जाहीर होताच काँग्रेस कार्यालयावर दगडफेक, 'चव्हाण पॅटर्न', फलकाला काळे फासले

Kolhapur North Assembly election 2024 congress leader Rajesh Latkar:काँग्रेसने या मतदारसंघावर दावा कायम ठेवत काल उमेदवारी जाहीर केली. काँग्रेसकडून राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. उमेदवारीनंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफुस सुरू झाली आहे.
Kolhapur North Assembly election 2024
Kolhapur North Assembly election 2024Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून (Kolhapur North Assembly election 2024) राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर आहे. त्यानंतर अज्ञात व्यक्तींनी काँग्रेस कार्यालयावर दगडफेक केली आहे. त्यासोबत काँग्रेस कमिटीच्या (congress) फलकाला काळे फासण्यात आले आहे.

रात्री उशिरा अज्ञातांनी हा प्रकार केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. शनिवारी (काल) रात्री महाविकास आघाडीकडून काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्यानंतर इच्छुकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. शिवाय काँग्रेस कमिटीच्या गेटवरच 'चव्हाण पॅटर्न' असा उल्लेख करीत अज्ञात आणि उमेदवारीबाबत रोष व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. कोल्हापूर शहरातील (kolhapur Politics) वातावरण चांगलेच तापले आहे.

Kolhapur North Assembly election 2024
Rajesh Latkar News : काँग्रेसचा 'कोल्हापूर उत्तरे'त मोठा धमाका, महायुतीला तगडं आव्हान देणारा 'कार्यकर्ता' उतरवला मैदानात

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये मोठी रस्सीखेच होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या मतदारसंघावर दावा करण्यात आला होता. काँग्रेसने या मतदारसंघावर दावा कायम ठेवत काल उमेदवारी जाहीर केली. काँग्रेसकडून माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. उमेदवारीनंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफुस सुरू झाली आहे.

काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण देखील कोल्हापूर उत्तर मधून आग्रही होते. मात्र काल उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही अनोळखी तरुणांनी चव्हाण पॅटर्न असे भिंतीवरती लिहीत किरकोळ दगडफेक केली. दगडफेकी नंतर घोषणाबाजी करत तरुण तेथून पसार झाले. या गोष्टीची माहिती मिळताच सचिन चव्हाण घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजय शेंडकर मोठ्या फोजपाट्यासह काँग्रेस कार्यालयात दाखल झाले. पुढील तपास पोलीस करत आहेत

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com