Maha Vikas Aghadi News: कोल्हापूर उत्तरचं उत्तर आणखी दोन दिवसांनी मिळेल. माजी आमदार मालोजीराजे छत्रपती आणि मधुरिमा राजे छत्रपती यांनी नकार दिला आहे. जनतेचाच पॅटर्न राबवला जाणार आहे.
महाविकास आघाडी करून कार्यकर्ताच या निवडणुकीच्या रिंगणात असेल असे संकेत महाविकास आघाडीचे नेते आणि काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद बोलताना दिली आहे.
आज इच्छुक उमेदवार आणि मालोजीराजे यांच्यासोबत बैठक झाली. मुलाखत दिलेल्यापैकी इच्छुक उमेदवार म्हणून असेल,आम्हाला मॅच जिंकायची आहे त्यामुळे शेवटचा सिक्स आम्ही मारणार. महायुतीच्या उमेदवाराची देखील घोषणा झाली नाही, असेही सतेज पाटील म्हणाले आहेत.
शक्तीपीठ महामार्ग सरकारने रद्द केला नाही.निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांची ही फसवणूक आहे.सरकारला शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर हा महामार्ग रद्द करावा. इतका मोठा निर्णय जर 15 तारखेला आला असेल तर 23 तारखेला घोषित का केला? का अधिकारी जुन्या तारखेनवरून आदेश काढत आहेत. यामध्ये अधिकाऱ्यांची चौकशी करायला पाहिजे. शिवाय पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना देखील जाब विचारायला हवा, अशी मागणी सतेज पाटील यांनी केली.
महाविकास आघाडीमध्ये जो मतदारसंघ ज्या पक्षाकडे जाईल त्यांचा हा निर्णय असेल. त्यामुळे राधानगरीची जागा शिवसेना ठाकरे गटाकडे गेली आहे. त्यांनी के पी पाटील यांच्याबद्दल निर्णय घेतला आहे. पण जिल्ह्यात महाविकास आघाडीकडून कुठंही बंडखोरी होऊ नये यासाठी माझा प्रयत्न असणार असल्याचे सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.
लाडक्या बहिणीला 1500 रुपये द्यायचे आणि दुसरीकडे महागाई फोडणी दिली आहे. पोलीस इतर चौकशीत लगेच तत्परता दाखवतात.मात्र 5 कोटी सापडलेल्या प्रकरणात कोणतीच माहिती देत नाहीत. किती रक्कम होती, कुणाची रक्कम होती, किती गाड्या होत्या, काही रक्कम इतर गाडीतून पुढे गेली आहे का? अशी शंका सतेज पाटील यांनी उपस्थित केली.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.