Kolhapur Police: दोन लग्न करणारा आणखी एक पोलिस निलंबित, तर मुलीची छेड काढणारा बडतर्फ; कोल्हापुरात चाललंय काय?

Kolhapur Police Suspension News: एकाचवेळी पाच पोलिसांवर वेगवेगळ्या कारणांतून झालेल्या कारवाईमुळे पोलिस दलात खळबळ उडाली. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी याबाबतचे आदेश आज काढले.
Kolhapur Police Suspension News
Kolhapur Police Suspension NewsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: तीन लग्न केल्याचा आरोप स्वतःच्या बायकोने केल्यानंतर झालेल्या चौकशीनंतर शिरोळ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक इमरान मुल्ला याला निलंबन केल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक ॲक्शन मोडवर आले आहेत. ही घटना ताजी असतानाच आणखी एका कर्मचाऱ्याला दोन लग्न केल्याचे समोर आल्याने त्याचे देखील निलंबन केले आहे. काल दिवसभरात एका पोलिसाचे बडतर्फ केले.

रुग्णालयात जखमी मुलीचा जबाब नोंदविताना असभ्य वर्तन केल्याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेला पोलिस नाईक चेतन घाटगे याला पोलिस खात्यातून बडतर्फ करण्यात आले. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी ही कारवाई केली. एकाचवेळी पाच पोलिसांवर वेगवेगळ्या कारणांतून झालेल्या कारवाईमुळे पोलिस दलात खळबळ उडाली. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी याबाबतचे आदेश आज काढले.

दरम्यान पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शिरोळ पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक इमरान मुल्ला यांच्या पत्नी आफरीन मुल्ला यांनी तक्रार केली आहे. त्यांनी केलेल्या तपासानंतर निष्पन्न झाल्यानंतर शिरोळचे पोलीस उपनिरीक्षक याला निलंबित करण्यात आले. चंदगड पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक राजाराम पावसकर यांनीही दुसरे लग्न केल्याची तक्रार पत्नीने केली होती. या तक्रारीची दखल घेत एकापेक्षा अधिक विवाहाबाबत महाराष्ट्र पोलिस नियमावली भाग एकमधील ४१४ चा भंग केल्याने पोलिस दलाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आले.

Kolhapur Police Suspension News
Pratap Sarnaik: अजितदादांच्या खात्यावर प्रताप सरनाईकांचा रोष; थेट पत्रकार परिषद घेऊनच केली अधिकाऱ्यांची पोलखोल

पोलीस न्याय संकुलात ड्युटीवर असताना गैरहजर राहिल्याचे तीन पोलीस आढळून आले होते. सहायक फौजदार कृष्णात ठाणेकर, प्रेमसागर मधाळे, प्रकाश पाटील यांचा समावेश आहे. त्यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर काही महिन्यांपूर्वी चंदनाच्या झाडांची चोरी झाली होती. यावेळीही कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांवर कारवाई झाली होती.

तर मुलीचा जबाब घेण्यासाठी गेलेल्या पोलीस नाईक चेतन घाटगे यांनी मुलींशी गैरवर्तन करणाऱ्या चेतन घाटगे याला देखील जिल्हा पोलीस प्रमुखांनी बडतर्फ केले. आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या मुलीचा जबाब नोंदविण्यासाठी घाटगे दोन एप्रिलला नागाळा पार्कातील रुग्णालयात गेला होता. अतिदक्षता विभागात या मुलीला स्वतःचा मोबाईल नंबर देऊन, ‘तू माझी मैत्रीण आहेस, काही अडचण असल्यास मला फोन कर’ असे सांगितले. तसेच असभ्य वर्तन केले.

याप्रकरणी त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र गुन्हा नोंद होताच पसार झाल्यानंतर आजरा तालुक्यातील किटवडे गावातून त्याला अटक करण्यात आली. त्याला पोलिस दलातून बडतर्फ केल्याचा आदेश पोलिस अधीक्षकांनी आज काढला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com