
KolhApur News: करवीर विधानसभा मतदारसंघातील या विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार आणि दिवंगत आमदार पीएन पाटील यांचे चिरंजीव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांचा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होणार आहे.
त्यानिमित्ताने आज अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. विकास कामासंदर्भात आढावा बैठक, अंतर्गत कार्यक्रम गाठीभेटी होणार आहेत. मात्र उपमुख्यमंत्री पवार कोल्हापूर दौऱ्यावर येताच भाजपला धक्का दिला आहे.
भाजपचे कार्यकारणी विशेष सदस्य आणि चंदगडचे युवा नेते संग्राम सिंह कुपेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार राजेश पाटील यांची देखील उपस्थित होती. पक्षप्रवेशा संदर्भात अर्धा तास राष्ट्रीय विश्रामगृह येथे चर्चा सुरू होते.
लवकरच संग्रामसिंह कुपेकर हे आपला निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे, मात्र राष्ट्रवादीकडून कुपेकर यांच्या पक्षप्रवेशाच्या निर्णयाला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.
चंदगड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे सहयोगी आमदार शिवाजीराव पाटील आणि भाजपचे विशेष कार्यकारी सदस्य संग्राम सिंह कुपेकर शक्तिपीठ महामार्गाच्या आंदोलनावरून चांगलीच जुंपली आहे. एकमेकांना खुले आव्हान माध्यमांवरून दिले जात आहे.दोघेही भाजपचे असल्याने परस्पर विरोधी भूमिका समोर आल्यानंतर पक्षातील वरिष्ठांनी चांगलीच कान उघाडणी केली होती. त्यामुळे चंदगड विधानसभा मतदारसंघातील भाजपमधील अंतर्गत वातावरण ढवळून निघाले होते.
संग्राम सिंह कुपेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या पक्षप्रवेशा संदर्भातील चर्चा शासकीय विश्रामगृहावर खुलेआम होऊ लागले आहेत. संग्राम सिंह कुपेकर यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेतून त्यांनी भाजपमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला होता. त्यानंतर ते भाजपमध्ये सक्रिय झाले होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी महायुती सोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. मात्र चंदगडची जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली. तर आमदार शिवाजीराव पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवून विजय मिळवला. शिवाजी पाटील यांनी भाजपला पाठिंबा देत आपण सहयोगी सदस्य असल्याची घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सर्वात नजीकचे म्हणून शिवाजीराव पाटलांची ओळख आहे.
मात्र गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गाला विरोध आहे. या विरोधकाच्या भूमिकेमध्ये संग्राम सिंह कुपेकर हे देखील आहेत. माजी आमदार राजेश पाटील यांच्यासोबत आंदोलनात अग्रभागी होते. तर काही दिवसांपूर्वी शिवाजीराव पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ मोर्चा काढला. यावरून संग्रामसिंह कुपेकर आणि शिवाजीराव पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोपाचे खेळ रंगले होते. त्यानंतर संग्राम सिंह कुपेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने पक्षप्रवेशा संदर्भातील चर्चा उलट सुलट सुरू आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.