Gokul Dudh Sangh: मुन्नाचं ज्ञान कमी, बंटीनं काढला वचपा; 'गोकुळ'च्या अध्यक्षपदावर आज मार्ग निघणार?

Kolhapur Political News : सहकारामध्ये पक्षीय राजकारण नसतं. हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर ,नरके हे सर्वजण महायुतीचे प्रमुख नेते आहेत.त्यामुळे अरुण डोंगळे यांची एक वर्ष वाढीव अध्यक्ष राहण्याची इच्छा झाली असेल. या सर्वातून आज मार्ग निघेल, असेही पाटील म्हणाले.
Dhananjay Mahadik Vs Satej Patil
Dhananjay Mahadik Vs Satej PatilSarkarnama
Published on
Updated on

kolhapur News:गोकुळ दूध संघातील गोंधळावर आज काँग्रेसचे नेते आणि आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापुरात येताच प्रतिक्रिया दिली. गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांना राजीनामा न देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहेत. पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घातलं असेल असं मला वाटत नाही. हे जिल्ह्याच राजकारण आहे. फॉर्म्युल्यानुसार दोन दोन वर्ष ठरलं होतं. 15 मे पर्यंत अरुण डोंगळे यांनी राजीनामा द्यावा, अशी अपेक्षा होती, असे सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.

यामध्ये कोणतेही पक्षीय राजकारण नाही. महाविकास आघाडी म्हणून आम्ही गोकुळची निवडणूक लढवली नव्हती.गोकुळमध्ये मी आणि मुश्रीफ एकत्र आहोत. मात्र आजरा कारखान्यात एकमेकांच्या विरोधात आहोत. सहकारामध्ये पक्षीय राजकारण नसतं. हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर ,नरके हे सर्वजण महायुतीचे प्रमुख नेते आहेत.त्यामुळे अरुण डोंगळे यांची एक वर्ष वाढीव अध्यक्ष राहण्याची इच्छा झाली असेल. या सर्वातून आज मार्ग निघेल, असेही पाटील म्हणाले.

राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर आज त्याचा वचपा सतेज पाटील यांनी काढला. त्यांचं यासंदर्भात त्याचं ज्ञान कमी आहे. त्यांनी भीमा कारखान्याचे क्रशिंग येथे झाला आहे. हे त्यांनी सांगितलं तर कोल्हापुरातील सहकाराला त्यांचे मार्गदर्शन होईल, असा टोला सतेज पाटील यांनी महाडिक यांना लगावला.

Dhananjay Mahadik Vs Satej Patil
Marathi Language: अभिजात दर्जा मिळाला पण, मायभूमीतच मराठी ठरतेय अडचणीची? दहावीत 38 हजार विद्यार्थी नापास

लोकशाही मध्ये निवडणुका या टेस्ट असतात. पुढच्या वर्षी जिल्हा बँक आणि दूध संघाच्या निवडणुका आहेत. सहा महिन्यात नगर पालिका,जिल्हा परिषद निवडणूक आहे. या सर्वात जनता आपला कौल दाखवत असते. आम्ही दूध दरवाढीचा जो शब्द दिला होता. त्याप्रमाणे दरवाढ केली आहे. शेतकऱ्यांना माहीत आहे. गोकुळ कोणाच्या हातात असलं तर टँकर कोणाचे लागणार, अविश्वास ठराव आणण्याची वेळ येणार नाही सामंजस्यने प्रश्न मिटेल, असेही पाटील म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकासंदर्भात बोलताना, हर्षवर्धन संकपाळ यांच्या उपस्थितीत पॉलिटिकल अफेअर कमिटीशी बैठक आम्ही घेणार आहोत. प्राथमिक चर्चा सुरू आहेत. जिथे महाविकास आघाडी म्हणून शक्य असेल तेथे आम्ही एकत्र असणार आहोत.महापालिका, नगरपरिषद ,जिल्हा परिषद अशा अनेक निवडणुका आहेत. निवडणूक आयोग कशा पद्धतीने या निवडणुका घेणार आहे. पावसाळ्याचं वातावरण असल्याने त्याचे नियोजन कसे करणार? निवडणूक आयोगाला अशा अनेक प्रश्नांसंदर्भात महाविकास आघाडी म्हणून भेटणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com