
Kolhapur News: महायुतीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश करत असलो तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आम्ही पक्षप्रवेश करताना एक अट ठेवूनच पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २५ ऑगस्ट रोजी करवीर मधील सडोली खालसा येथे पक्षप्रवेश होणार आहे. पण आमदार चंद्रदीप नरके हे आमचे पारंपारिक विरोधकच आहेत.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, इतर निवडणुकीत ते आमचे विरोधकच राहतील. करवीर विधानसभा मतदारसंघात आम्ही केवळ राष्ट्रवादी आणि पीएन पाटील गट म्हणूनच निवडणूक लढवू, अशी घोषणा दिवंगत आमदार पी.एन पाटील यांचे पुत्र आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी केली.
भोगावती कारखाना संदर्भात आम्ही कर्जासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी गेलो. त्यावेळी आम्हाला पक्षप्रवेशाचा पर्याय ठेवला होता. त्यामुळे कार्यकर्त्यांना विचारत घेतले. प्रशासकीय, पोलिस, विविध कार्यालय या ठिकाणी अडवणूक होत असल्याचे लक्षात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्या भेटीतच कर्ज देण्याची ग्वाही दिल्याने पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्टीकरण राहुल पाटील यांनी पक्षप्रवेशाला दुजोरा दिला.
विधानसभेनंतर जवळपास 8 महिन्याचा कालावधी लोटलेला आहे. या काळात अनेक आव्हाने समोर येत आहेत. राजकीय तसेच सहकारातील आव्हानामुळे नेते, कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. पी. एन. साहेबांच्या काळात त्यांचा दोन वेळा पराभव झाले. पण त्यांच्या पाठीमागे विलासराव देशमुख यांच्यासारखे नेते होते. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांना फारशी झळ बसली नाही. पण आजची परिस्थिती वेगळी आहे. राजकारणाचे रंगही बदलले आहेत. अशा वेळी कार्यकत्यांनी विचारविनिमय करीत असताना वेगळ्या वाटेवरून जाण्यासंदभातील सूचना मांडल्या. असल्याचे राहुल पाटील यांनी स्पष्ट केले.
त्यावेळी वेगवेगळे पर्याय तपासून पाहण्यात आले. आणि त्यामध्ये सर्वानुमते, पी. एन. पाटील साहेबांवर प्रेम, आस्था आाणि आत्मियता बाळगणाच्या लोकांनी सामूदायिकरित्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष, अजितदादा यांच्या नेतृत्त्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे. २५ ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पी. एन. पाटील साहेबांवर श्रद्धा असणाच्या गटाचा जाहीर प्रवेश सड़ोली खालसा, ता. करवीर येथे होत आहे, अशी माहिती राहुल पाटील यांनी दिली.
दुर्दैवाने मागील वर्षी साहेबांचे आकस्मित निधन झाले, मतदारसंघ पोरका झाल्याची स्थिती निर्माण झाली. साहेबांच्या निधनाची घटना आकस्मितपणे घडली. या अनपेक्षित धक्क्यातून सावरण्यास मतदारसंघातील नेते, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य माणसांचे बळ कारणीभूत ठरले. लोकांनी वडिलानंतर नेतृत्त्वाची जबाबदारी आमच्याकडे सोपवली.
जबाबदारीचे हे शिवधनुष्य पेलणे ही आमची परीक्षा होती. पण साहेबांवर प्रेम आस्था असणाच्या कार्यकत्याच्या बळावर आम्ही तयारीला लागलो. आमची परीक्षा विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा कसाला लागली. संपूर्ण महाराष्ट्रात धक्कादायक निकाल लागले. अशा काळातही अगदी थोड्या मतांनी माझा पराभव झाला, कार्यकत्यांनी जीवापाड मेहनत केली पण यश मिळाले नाही. अशी भावना राहुल पाटील यांनी मांडली.
ज्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट झाल्याची माहिती आमदार सतेज पाटील यांना मिळाल्यानंतर मी आणि बंधू राजेश पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी असा निर्णय घेऊ नये, अशी विनंती केली. मात्र कार्यकर्त्यांना जो निर्णय मान्य असेल तर तो निर्णय घेणार असल्याचे स्पष्टीकरण राहुल पाटील यांनी दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.