Kolhapur Tourists Saved : घोड्यांची वाट पाहत बसले अन् 28 जणांचे प्राण वाचले; कोल्हापुरातील पर्यटकांसाठी 'तो' ड्रायव्हर बनला देवदूत, नेमकं काय घडलं?

Pahalgam Terror Attack : "दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आम्ही पहलगाम या पर्यटन स्थळी जाण्यासाठी सज्ज होतो. सोबत कुटंबीय आणि सहकारी यांच्यासह 28 जण होते. त्या ठिकाणी जाण्यासाठी घोड्यांची वाट पाहत होतो. मात्र, तेवढ्यात एका स्थानिक ड्रायव्हरने 'उधर मत जाओ, फायरिंग शुरु है', असं सांगितलं अन्"
Pahalgam Terror Attack, Kolhapur Tourists Saved
Pahalgam Terror Attack, Kolhapur Tourists SavedSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 23 Apr : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातून बचावलेल्या कोल्हापुरातील पर्यटकांनी आपला थरारक अनुभव सांगितला आहे. घोडं उशिला आल्यामुळे जवळपास 28 जणांचे प्राण वाचल्याचं जम्मू काश्मीरला गेलेले पर्यटक अनिल कुरणे यांनी सांगितलं आहे.

त्यांनी सांगितलं की, दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आम्ही पहलगाम या पर्यटन स्थळी जाण्यासाठी सज्ज होतो. सोबत कुटंबीय आणि सहकारी यांच्यासह 28 जण होते. त्या ठिकाणी जाण्यासाठी घोड्यांची वाट पाहत होतो.

मात्र, तेवढ्यात एका स्थानिक ड्रायव्हरने 'उधर मत जाओ, फायरिंग शुरु है', असं सांगितल्यामुळे आमचा तिकडे जाण्याचा उत्साह क्षणात निघून गेला आणि फायरिंग होत असल्याचे कळताच पायात त्राण उरले नाहीत आणि मोठा धक्का सर्वांना धक्का बसला, शिवाय पहलगामला जाण्यासाठी घोडे उशिराने मिळाल्यामुळे आम्हा सर्वांचे प्राण वाचल्याचा थरारक अनुभव अनिल कुरणे यांनी सांगितला. हे सर्व सांगताना ते अक्षरश: थरथरत होते.

Pahalgam Terror Attack, Kolhapur Tourists Saved
Pahalgam Terror Attack : रुपाली ठोंबरे अडकल्या काश्मीरमध्ये...; दहशतवादी हल्ल्याचा 'थरार' सांगताना झाल्या भावूक, VIDEO व्हायरल!

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कोल्हापूरहून (Kolhapur) गेलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही पर्यटक तिथे अडकल्याने नातेवाईकांशी संपर्क करून आपण सुखरूप असल्याचे सांगितले आहे. यापैका एक असलेल्या अनिल कुरणे यांनी देखील ते सुखरूप असल्याचं कळवलं आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील आणि सांगली जिल्ह्यातील असे एकूण 28 जण जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेले आहेत. मात्र, पहलगाम येथे जाण्यासाठी दुपारी तीन वाजता ते घोड्यांच्या तबेला जवळ पोहोचले. तेथून दोन किलोमीटर अंतरावरून हे सर्व 28 जण घोडस्वारी करून पहलगाम येथे मुक्काम स्थळी पोहोचणार होते.

Pahalgam Terror Attack, Kolhapur Tourists Saved
India Counterstrike : मोदी-शाह 6 वर्षांपूर्वीचा प्लॅन पुन्हा प्रत्यक्षात आणणार? पहलगाममधील हल्ल्यानंतर लष्कर अलर्टवर

मात्र, घोड्यांचा राबता कमी असल्याने त्यांना काही काळ वाट पाहावी लागली. तर थोड्या वेळाने त्यांना घोडे मिळाले. काही जण घोड्यावर बसले. पण स्थानिक एका ट्रॅव्हलर्सच्या ड्रायव्हरने पहलगाम येथे जाऊ नका तिथे गोळीबार सुरू आहे, असे सांगितल्यामुळे या सर्वांनी तिथं जाणं टाळलं.

त्यामुळे घोडे उशिरा मिळाल्याने त्यांचा जीव वाचल्याचं पर्यटक सांगत आहेत. जर घोडे लवकर मिळाले असते आणि आम्ही तिथे पोहोचलो असतो तर आमचाही जीव दहशतवाद्यांनी घेतला असता, या कल्पनेनेच त्यांची भीतीने गाळण उडाली होती. यावेळी त्यांनी जीव वाचला यासाठी आम्ही देवाचे मनापासून आभारही मानले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com