

Pune : दिग्ग्ज नेत्यांच्या ताकदीला शह देत सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीने नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. पेठ वडगावमध्ये नगराध्यक्षपदी विद्या गुलाबराव पोळ या विराजमान झाल्या आहेत. पुण्याचे माजी पोलीस आयुक्त आणि सेवानिवृत्त पोलीस अधिकारी गुलाबराव पोळ यांच्या त्या पत्नी आहेत. विद्या पोळ या एका शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा आहेत. त्यांच्या विजयामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे.
विद्या पोळ यांनी जनसुराज्य-ताराराणी आघाडीच्या उमेदवार प्रविता सालपे यांचा पराभव केला आहे. पोळ यांना २१६५ मते मिळाली. स्थानिक पातळीवर तयार करण्यात आलेल्या ‘यादव आघाडी’ने १५ जागा जिंकत विजय खेचून आणला.पेठवडगावचा सर्वांगीण विकास करणे, नागरिकांसाठी अधिकाधिक सुविधा निर्माण करणे, सर्वसमावेशक कामे करण्यावर भर देणार असल्याचे विद्या पोळ यांनी सांगितले.
स्थानिक निवडणुकीसाठी पेठ वडगावमध्ये गाव पुढाऱ्यांकडून नगराध्यक्षपदासाठी यादव आघाडी तयार करण्यात आली होती. या आघाडीकडून विद्या पोळ या निवडणुकीच्या मैदानात होत्या. या आघाडीविरोधात जनसुराज्य शक्ती पक्ष-ताराराणी आघाडी लढली. एकूण २० जागांसाठी झालेल्या मतदानात यादव आघाडीने १५ जागा जिंकल्या. जनसुराज्य-ताराराणी आघाडीला केवळ ५ जागांवर समाधान मानावे लागले.
वर्षा सतीश पोवार, विशाल विजय वडगावे, रूपाली अभिजीत माने, कल्पना सर्जेराव भोसले, सुरेखा महादेव अनुसे, धनश्री इंद्रजीत पोळ, मिलिंद लमुवेल सनदी, निवास वसंत धनवडे, अभिजीत बाळासो गायकवाड, प्रविण आप्पासाहेब पाटील, सुषमा बाबासाहेब पाटील, नीला जयसिंग जाधव, जवाहर बाजीराव सलगर, सुमन अशोक कोळी, गुरूप्रसाद दिलिपसिंह यादव,
अजय थोरात, संतोष चव्हाण, अंजली थोरात, मोहनलाल माळी, राजश्री भोपळे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.