Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance: महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक घडामोड : ठाकरे बंधूंकडून युतीची अधिकृत घोषणा, मुंबईचा महापौरही ठरवला!

Shiv Sena UBT MNS alliance: मुंबईचा महापौर हा मराठीच होईल, असा विश्वास राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्र रक्षणासाठी मराठी माणसाची ही युती असेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
Shiv Sena UBT MNS alliance
Shiv Sena UBT MNS allianceSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: शिवसेना उद्वव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ऐतिहासिक युती आज झाली. उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली.

मुंबईचा महापौर हा मराठीच होईल, असा विश्वास राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्र रक्षणासाठी मराठी माणसाची ही युती असेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

5 जुलै रोजी दोन्ही भाऊ पहिल्यांदा एकत्र आले होते. आज ते राजकीय पक्षाच्या माध्यमातून एकत्र आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती झाली आहे. ठाकरे बंधूंची राजकीय युती झाल्याने आता आगामी महापालिका निवडणुकीसाठी विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Shiv Sena UBT MNS alliance
Kalyan Dombivli News: कल्याण–डोंबिवलीत महायुतीचे ठरेना! जागावाटपावरून भाजपा–शिवसेनेत रस्सीखेच

पत्रकार परिषदेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसोबत मनसेचे इंजिन निवडणूक चिन्ह आणि ठाकरे सेनेची मशाल चिन्ह होते. दोन्ही पक्षातील मोठे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा झाली. मुंबईतील वरळीमधील हॉटेल ब्लू सीमध्ये पत्रकार परिषद घेत दोन्ही पक्षांच्या युतीची घोषणा केली. मुंबईसह, ठाणे, मीरा भाईंदर, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, नाशिक, पुणे महापालिकेची निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढायचा निर्णय झाला आहे.

तुटु नका, फुटू नका, मराठीचा वसा टाकू नका. मराठी माणूस कोणाच्या वाट्याला जात नाही आणि कुणी त्याच्या वाट्याला आलं तर त्याला सोडत नाही, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितलं. राज ठाकरे यांनी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची घोषणा केली. आज शिवसेना आणि मनसेची युती झाली, हे मी जाहीर करतो, असं राज ठाकरे म्हणाले.

ठाकरे बंधूंची युती होतेच ठाण्यात मनसे व शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र जल्लोष केला. ढोल ताशा वाजवत पेढे भरवत कार्यकर्त्यांनी फटाके उडवले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com