Koyana : कोयना जलविद्युत प्रकल्पग्रस्तांना पदभरतीत प्राधान्य... शंभूराज देसाई

कोणताही पात्र प्रकल्पग्रस्त project sufferer भरतीपासून वंचित राहू नये यासाठी ऊर्जा, जलसंपदा Energy, water resources तसेच यामध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्व विभागांनी सर्वानूमते प्रस्ताव बनवावा.
Minister Shambhuraj Desai
Minister Shambhuraj Desaisarkarnama
Published on
Updated on

मुंबई : कोयना जलविद्युत केंद्र पोफळी येथील पात्र प्रकल्पग्रस्तांचा ऊर्जा विभागाच्या तांत्रिक पदभरतीमध्ये प्राधान्याने विचार करावा. याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तयार करावा, असे आदेश साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत.

कोयना जलविद्युत केंद्र पोफळी येथील प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत मंत्रालयातील दालनात बैठक झाली. यावेळी मंत्री देसाई बोलत होते. यावेळी आमदार सदानंद चव्हाण, उपसचिव ऊर्जा सतीश सुपे, सातारा येथील अधिक्षक अभियंता संजय डोईफोडे, सहाय्यक कामगार आयुक्त रत्नागिरी संदेश आयरे, पुनर्वसनचे उपसचिव धनंजय नायक, यासह कोयना जलविद्युत प्रकल्प येथील प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

Minister Shambhuraj Desai
Karad : उद्धव ठाकरेंनी आमदारांवर गैरविश्वास का दाखवला... शंभूराज देसाईंचा सवाल

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, कोयना जलविद्युत केंद्र पोफळी येथील पात्र प्रकल्पग्रस्तांना ऊर्जा विभागात भरती करताना डावलले जावू नये. कोणताही पात्र प्रकल्पग्रस्त भरतीपासून वंचित राहू नये यासाठी ऊर्जा, जलसंपदा तसेच यामध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्व विभागांनी सर्वानूमते प्रस्ताव बनवावा.

Minister Shambhuraj Desai
पाटणकरांना धक्का; मोरगिरीत ६० वर्षांनी सत्तांतर, शंभूराज देसाई गटाची सत्ता

ऊर्जा विभागाच्या भरती प्रक्रियेत जे प्रकल्पग्रस्त आहेत आणि ज्यांच्याकडे विहित पात्रता आहे. त्यांना भरती प्रक्रियेत प्राधान्य देण्यात यावे. कंत्राटी पदभरतीमध्ये या प्रकल्पग्रस्तांचा प्राधान्याने विचार करावा. या विषयांचा यामध्ये समावेश करावा. सर्वसमावेशक प्रस्तावानंतर याबाबत निर्णय घेता येईल, अशी माहिती मंत्री देसाई यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com