
Solapur, 19 January : आता संजय गांधी निराधार योजना बंद झाली आहे आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाही बंद होणार आहे. लाडक्या बहीण योजनेमुळे तुम्ही त्यांना मतदान केलं. मात्र, आता लाडकी बहिणही सावत्र झाली आहे, असा दावा सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे.
सोलापूर शहरातील शास्त्री नगर भागात विकास कामाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात बोलताना प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या, जेव्हा काँग्रेसचे सरकार होते, तेंव्हा विडी कामगारांचे कारखाने वाचले, कामगारांना पेन्शन मिळत होती. सिलिंडर फक्त 800 रुपयाला होतं. आता संजय गांधी निराधार योजना बंद झाली आणि लाडकी बहीण योजना पण बंद होणार आहे.
लाडकी बहीण योजनेमुळे (Ladaki Bahin Yojana) तुम्ही महायुतीला मतदान केलं. मात्र, आता लाडकी बहिणही सावत्र झाली आहे. पैसे घेऊन तुम्हाला आत्मविश्वास आणि संरक्षण मिळणार आहे का? पैसे घेऊन तुम्हाला दोन दिवसांसाठी आनंद मिळेल, त्यानंतर खा मार नवऱ्याचा..अशी परिस्थिती आहे. पैसे घेऊन दारू थांबणार नाही, मग काय उपयोग..? असा दावाही प्रणिती शिंदे यांनी केला आहे.
पैसे घेऊन बिनधास्त जगायला मिळणार आहे काय? सगळ्या गोष्टी पैशाने मिळत नाहीत. मात्र, भाजपला वाटतं तुम्हाला ते पैशाने खरेदी करू शकतात. मी बोलून बोलून थकले आहे. आता तुम्हाला समजायला पाहिजे, असे शब्दांत प्रणिती शिंदे यांनी लाडकी बहिण योजनेवर पुन्हा भाष्य केले.
त्या म्हणाल्या, तरुण मुलं हे व्हॉट्स ॲप बघतात आणि त्या नादाला जातात, त्यामुळे व्हॉट्स ॲप ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. त्या माध्यमातून कट्टरतेचे विष पेरून लोकांची भांडण लावतात, असा आरोपही प्रणिती शिंदे यांनी केला. त्या म्हणाल्या, सोलापूरच्या गड्डा जत्रेत सगळेच जातात. मी पण जाते, गड्डा सगळ्यांचाच आहे. कोणाचा इकडे हक्क नाहीय, सोलापूर सगळ्यांचंच आहे.
देशाला वाचवा एवढी विनंती करते. सोलापुरात आता 43 लाखाचं काम करत आहे, त्यामुळे किमान कामाला किमत द्या, मी तुम्हाला कधीच सोडणार नाही, असा दावाही प्रणिती शिंदे यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.