
Solapur, 17 January : आतापर्यत आपण कधीही भेदभाव केला नाही...पण मागच्या निवडणुकीमध्ये तुम्ही धर्मावर मतदान केलं...तुम्ही कामाला मतदान दिलं नाही...आज इलेक्शन नाही; पण मला आपल्याशी बोलावसं वाटतंय...मला माफ करा.. मी बोलू की नको बोलू? असा सवाल सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात बोलताना उपस्थितांना केला.
खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) आज सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होत्या. सायंकाळी सोलापूर शहरात बोलताना खासदार शिंदे यांनी राजकारणातील धर्माच्या वाढत्या मुद्यावर बोट ठेवले. त्या म्हणाल्या, मला एका गोष्टीचं वाईट वाटतं...परवा विधानसभेचं इलेक्शन झालं आणि माझं खासदारकीचं पण झालं... तुम्ही कधीही जात-पात, धर्म मानला नाही, तुम्ही नेहमी कामाला मतदान केलं आहे..पण मागच्या निवडणुकीत तुम्ही धर्मावर मतदान केलं.. तुम्ही कामाला मतदान दिलं नाही.. तुम्ही जय श्रीरामला मतदान केलं...तर कधी कुराणला मतदान केलं...
कामाला मतदान केलं नाही.. याचं मला वाईट वाटलं. कारण ही मातृभूमी सगळ्यांची आहे. मातृभूमीने केव्हा भेदभाव केला नाही.. मिनी इंडिया.. छोटा भारत (Bharath) कुठे आहे माहिती आहे ? इकडे शास्त्रीनगर...बघा आजूबाजूला, असे म्हणत त्यांनी धर्मनिरपेक्ष भारताच्या मुद्यावर बोट ठेवले.
प्रणिती शिंदे म्हणाल्या, मी आज सकाळी मोहोळ तालुक्यातल्या मुंढेवाडी गावात जाऊन आले...त्या गावात शंभर टक्के मराठा राहतात... मराठा म्हणजे हिंदूं ना? (उपस्थितांना प्रश्न विचारला) मुंढेवाडीत ग्रामदैवत कोण आहे माहितीय? दर्गा आहे... बीबी फातिमा... बीबीची दर्गा आहे. ... पण तेथील सर्व हिंदू लोक म्हणतात, या देवामुळे आमचं गाव चांगलं आहे...
मुंढेवाडीप्रमाणे खूप ठिकाणी मी बघितलं आहे...गाव संपूर्ण मुस्लिम आहे आणि गावात देव देवी असतात. विशेष म्हणजे सगळेजण त्यांना मानत असतात. आपण कधीही भेदभाव केल नाही. आज इलेक्शन नाही; पण मला आपल्याशी बोलावसं वाटतंय... मला माफ करा.. मी बोलू की नको बोलू? असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला.
प्रणिती शिंदे म्हणाल्या, मला वाईट वाटतं...मी या देशासाठी काम करते...मी कोणत्या एका धर्मासाठी, समाजासाठी काम करत नाही...जे गरीब आहेत, त्यांच्यासाठी मी काम करते. फक्त सोलापूर नाही तर आज मला या देशाचा वाईट वाटतंय... कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत मला देशाचा वाईट वाटतंय. आपल्या देशाचा कणा.. आपल्या देशाचा आत्मा सर्वधर्मसमभाव आहे... आपल्या देशाचा आत्मा संविधान आहे... कधीही जात-पात मानला नाही.. कधी धर्म मानला नाही...
लग्न करायचं असेल तर धर्म वगैरे ठीक आहे...पूजा करायची असेल तर ठीक आहे...पण इलेक्शनमध्ये? राजकारणामध्ये? धर्मामध्ये राजकारण आणायचं नाही आणि राजकारणामध्ये धर्म आणायचा नाही, ही आपली पद्धत आहे, असा दावाही खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.