Sambhaji Bhide Guruji Dog Attack : 'संभाजी भिडे गुरुजींना चावलेला कुत्रा दत्तक घेणार अन् त्याचा...'; कुणी केली मोठी घोषणा?

Sambhaji bhide News : सांगलीतील माळी गल्लीत राहणार्‍या एका धारकऱ्याच्या घरी ते सोमवारी (ता.14) भोजनासाठी गेले होते. तिकडून परतत असताना भिडे गुरुजींवर एका कुत्रीने हल्ला चढवत त्यांच्या पायाला कडकडून चावाही घेतला.
Sambhaji Bhide
Sambhaji BhideSarkarnama
Published on
Updated on

Sangli News:'शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान'चे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर एका भटक्या कुत्र्यानं हल्ला करत पायाला चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सांगलीमध्ये सोमवारी (ता.14) रात्री घडली. या घटनेनंतर प्रशासनाकडून भटक्या कुत्र्यांचवर कारवाई करण्यात येत आहे. यातच या कुत्र्याला दत्तक घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

उल्हासनगर मधील वकील जय गायकवाड यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी संभाजी भिडे गुरूजी (Sambhaji Bhide) यांच्यावर ज्या कुत्र्यानं हल्ला केला,तसेच त्यांना चावा घेतला. त्या कुत्र्याला दत्तक घेऊन त्यांचा सांभाळ करणार असल्याची माहिती अॅड.जय गायकवाड यांनी दिली आहे.

ते म्हणाले,संभाजी भिडे यांना जो कुत्रा चावला आहे,त्याला दत्तक घेणार असून त्याची संपूर्ण काळजी आम्ही स्वतः घेणार आहोत. भिडेंना चावलेला कुत्रा नागरिकांना जर सापडला तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा.यानंतर स्वराज्य संघटनेकडून त्या नागरिकाचा मोठा सत्कारही आम्ही देखील करणार आहोत,असंही गायकवाड यांनी म्हटलं आहे.

Sambhaji Bhide
Supreme Court : ...म्हणून 'त्या' रुग्णालयाचे थेट परवानेच रद्द करा! सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला मोठे आदेश

सांगलीतील (Sangli) माळी गल्लीत राहणार्‍या एका धारकऱ्याच्या घरी ते सोमवारी (ता.14) भोजनासाठी गेले होते. तिकडून परतत असताना भिडे गुरुजींवर एका कुत्रीने हल्ला चढवत त्यांच्या पायाला कडकडून चावाही घेतला. या घटनेनंतर तत्काळ भिडे यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

संभाजी भिडे यांची प्रकृती सध्या ठणठणीत असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे. भिडे गुरुजींचे निकटवर्तीय अनुयायी हनुमंत पवार यांनी याबाबत माहिती दिली. सांगली पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी देखील या घटनेनंतर संभाजी भिडे यांची भेट घेऊन तब्येतची विचारपूस केली.

Sambhaji Bhide
Hemlata Patil Resign: एकनाथ शिंदेंना दीड महिन्यांतच नाशिकमध्ये मोठा धक्का; हेमलता पाटलांचा शिवसेनेचा तडकाफडकी राजीनामा

दरम्यान, भिडे यांना कुत्रा चावल्यानंतर सांगलीची महापालिका अॅक्शन मोडवर आली आहे. पालिकेकडून शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी मोहीम राबवली जात आहे. आतापर्यंत अनेक कुत्र्यांना पालिकेने पकडले आहे.

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी संभाजी भिडेंवर झालेल्या कुत्र्‍याच्या हल्ल्यावर भाष्य केले.ते म्हणाले,संभाजी भिडे यांना चावणाऱ्या कुत्र्याची SIT चौकशी करा असा टोलाही सरकारला लगावला. तसेच काय त्या कुत्र्याला दुर्बुद्धी सुचली. कुणाला चावावं हे कुत्र्याला कळलं नाही याचं वाईट वाटतं. पोलीस नक्की कुत्रा शोधत आहे, याची अजून माहिती मिळालेली नाही.मी माहिती घेतो. कुत्रा हा प्रामाणिक प्राणी असतो, मात्र या प्रामाणिक प्राण्याने का असा राग धरला, यासंदर्भात एसआयटी लावून चौकशी केली पाहिजे असा चिमटाही वडेट्टीवार यांनी काढला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com