पुणे : सांगोल्याचे (Sangola) आमदार शहाजी पाटील यांना शिवसेनेकडून आव्हान देण्याची तयारी प्रा. लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी दाखवली आहे. शिवसेनेत जाऊन शिवबंधन बांधल्यानंतर हाके यांनी शहाजी पाटील यांना लक्ष्य केले आहे. अकार्यक्षम आमदार म्हणून हाकेंनी शहाजी पाटील यांना टोला गेल्या काही दिवसांत लगावला.
हाके यांनी 2019 मध्ये `बीव्हीेए`कडून सांगोला विधानसभा मतदारसंघाती निवडणूक लढवली होती. शहाजी पाटील यांच्याविरोधात गणपतराव देशमुख यांचे नातू डाॅ. अनिकेत यांनी शेकापकडून जोरदार आव्हान दिले होते. दोघांमध्ये मतांचा फारसा फरक नव्हता. शिवसेनेचे उमेदवार असलेल्या शहाजी पाटलांना 99,464 तर देशमुख यांना 98,696 मते मिळाले. शहाजी पाटील हे केवळ 768 च्या मताधिक्याने विजयी झाले.
या निवडणुकीत एकूण 21 उमेदवार रिंगणात होते. तिसऱ्या क्रमांकावर राजश्री नांगणे यांना 4,486 मते मिळाली. इतर उमेदवारांना त्यापेक्षा कमी मते मिळाली. `नोटा` (या उमेदवारांपैकी कोणाही नाही) या पर्यायाला 700 मतदारांनी पसंती दाखवली. हा पर्याय दहाव्या क्रमांकावर राहिला. लक्ष्मण हाके हे 19 व्या क्रमांकावर राहत त्यांना 267 मते मिळाली. 20 व्या क्रमांकावरील उमेदवाराला 233 आणि 21 व्या क्रमांकावरील उमेदवाराला 220 मतांवर समाधान मानावे लागले.
या मतदारसंघात शिवसेनेची हक्काची मते आहेत. त्याचा उपयोग शहाजी पाटलांना वेळोवेळी झाला. त्यामुळे हाके यांना शिवसेनेची अधिकृत उमेदवारी मिळाली तर उद्धव ठाकरे यांना मानणाऱ्या शिवसैनिकांची ताकद त्यांच्या मागे उभे राहू शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.