Mumbai : लक्ष्मण माने स्वगृही; त्यांच्यामुळे अनेक वंचितांना न्याय मिळेल... जयंत पाटील

अजूनही मोठा वर्ग आहे जो न्यायापासून वंचित deprived of justice आहे. अशांना लक्ष्मण माने Laxman Mane साहेबांसारख्यांची गरज आहे, असेही जयंत पाटील Jayant Patil यांनी नमुद केले.
Laxman Mane In NCP
Laxman Mane In NCPsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : लक्ष्मण मानेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशामुळे अनेक वंचितांना न्याय मिळेल ही आशा आहे. यातूनच राष्ट्रवादी काँग्रेसला पून्हा गतवैभव मिळेल हा विश्वास आहे. श्री. माने यांनी आता निष्कलंक, कुठलाही स्वार्थ नसलेल्यांची नावे द्यावी त्यांना पक्ष वेगळी जबाबदारी देऊन महाराष्ट्रात आपण आगामी काळात काम करू, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

पद्मश्री लक्ष्मण माने यांनी आज मुंबईत आपल्या काही निवडक सहकाऱ्यांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी मंत्री डॉ. राजेश टोपे, बाळासाहेब पाटील, तसेच राष्ट्रवादीचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते. लक्ष्मण माने यांचा जयंत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, लक्ष्मण माने हे आज स्वगृही परतले. पण, परत येताना त्यांनी अनेक नवे साथीदार सोबत आणले आहेत. भटक्या विमुक्त जातींसाठी श्री. माने यांनी चांगलं काम केले आहे.

Laxman Mane In NCP
लक्ष्मण माने राष्ट्रवादीच्या वाटेवर; निवडक कार्यकर्त्यांसह सोमवारी पक्षप्रवेश

या समाजाला सक्षम करण्याचे त्यांचे काम नव्या पिढीला दिशा देणारे आहे. मागील ३० ते ४० वर्ष ते हे काम अविरतपणे करत आहेत. पवार साहेबांनी नेहमीच अशा व्यक्तींना न्याय दिला, जे कायम दुर्लक्षित असतात त्यांना पवारसाहेब कायमच जवळ करतात. अजूनही मोठा वर्ग आहे जो न्यायापासून वंचित आहे. अशांना माने साहेबांसारख्यांची गरज आहे. आज मोठा संघर्ष करून आपण सत्तेतून विरोधात बसलो आहे.

Laxman Mane In NCP
हिंदू हा शब्द गुलामीचे प्रतीक, आताच झुगारा : लक्ष्मण माने

पवारांच्या आग्रहाखातर अल्पसंख्याक व सामाजिक न्याय ही दोन खाती आम्ही मागून घेतली होती. ती याच शोषित वर्गाला न्याय देण्यासाठी. मी २००३ मध्ये अर्थसंकल्प मांडला यात काय असावं, याबाबत गाडी चर्चा करत असताना मला गांधीजींच्या पुतळ्याजवळ लक्ष्मण माने हे चालत जाताना दिसले. त्यांना मी गाडीत घेऊन नव्या अर्थसंकल्पात मानेंच्या सांगण्यावरून अनेक समाजाला न्याय दिला.

Laxman Mane In NCP
Shivsena: शिवसेनेच्या प्रत्येक फुटीमागे शरद पवार ; दीपक केसरकरांचा गंभीर आरोप

असा अर्थसंकल्प पुन्हा कधी झाला नाही. आजच्या या पक्षप्रवेशास अजित दादा येणार होते. मात्र राष्ट्रपती निवडणुकीत ते व्यस्त असल्याने ते उपस्थित नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, मानेंच्या सहभागाने अनेक वंचितांना न्याय मिळेल ही आशा आहे. यातूनच राष्ट्रवादी काँग्रेसला पून्हा गतवैभव मिळेल हा विश्वास आहे. माने हे निष्कलंक, कुठलिही स्वार्थ नसलेल्यांची नावे द्यावी त्यांना पक्ष वेगळी जबाबदारी देऊन महाराष्ट्रात काम करू.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com