Laxman Mane
Laxman Manesarkarnama

हिंदू हा शब्द गुलामीचे प्रतीक, आताच झुगारा : लक्ष्मण माने

या कवितेच्या माध्यमातून पवारांनी Sharad Pawar हिंदू देवदेवतांचा Hindu deities अपमान Insult केला असे वादग्रस्त टीका Controversial comment भाजपने BJP केली आहे.
Published on

सातारा : खासदार शरद पवार यांनी कवी जवाहर राठोड यांच्या पाथरवट कवितेचे निरूपन जकातवाडीच्या कार्यक्रमात केले होते. या कवितेवरील वक्तव्याचा राजकीय अन्वयार्थ लावणारे हे संकुचित मनोवृत्तीचे आहेत. या मनोवृत्तीला आत्ताच विरोध झाला पाहिजे, असे जर झाले नाही तर ब्राम्हणांच्या कटकारस्थानाला बहुजन समाजाचे तरुण बळी पडतील. हिंदू हा शब्द गुलामीचे प्रतीक असून तो शब्द आपण आताच झुगारला पाहिजे, असे आवाहन पद्मश्री लक्ष्मण माने यांनी केले आहे.

शासकीय विश्रामगृहात श्री. माने यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, "नऊ मे रोजी भटके-विमुक्त जाती जमाती संस्थेच्या वतीने पत्रकार निखिल वागळे यांना फुले आंबेडकर पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमात शरद पवार यांनी जवाहर राठोड यांची पाथरवट नावाची कविता वाचून दाखवत त्यावर निरूपन केले होते. या कवितेच्या माध्यमातून पवारांनी हिंदू देवदेवतांचा अपमान केला असे वादग्रस्त टीका भाजपने केली आहे.

Laxman Mane
Video: द्वेष परसविणाऱ्यांना धडा शिकवू; शरद पवार

मुळात पवारांवर टीका करण्याचा भाजपला कोणताही अधिकार नाही. या कवितेचा कोणताही राजकीय अर्थ लावला जाऊ नये. भाजप महाराष्ट्रामध्ये तोडा आणि फोडा हे तंत्र अवलंबून येत्या निवडणुकांमध्ये सत्ता हस्तगत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांचा गनिमी कावा हा बहुजन समाजाने तातडीने ओळखावा, असे आवाहन माने यांनी केले.

Laxman Mane
बहुजन वंचित आघाडी सर्व निवडणूका स्वबळावर लढणार : लक्ष्मण माने

हिंदू हा शब्द कोणत्याही उपनिषदांत नाही त्याचा पहिल्यांदा उल्लेख 1861 च्या ब्रिटिशांनी तयार केलेल्या गॅझेटमध्ये झाला होता. ब्राह्मण हे सुद्धा भारतीय नाहीत ते वैदिक आहेत. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी आपण हिंदू ब्राह्मण आहोत असे प्रमाणपत्र दाखवावे, ते दाखवू शकणार नाहीत.

Laxman Mane
देश संकटात असताना राममंदीर कशासाठी : लक्ष्मण माने

पवारांच्या कवितेवरील वक्तव्याचे राजकीय अन्वयार्थ लावणारे हे संकुचित मनोवृत्तीचे आहेत. या मनोवृत्तीला आत्ताच विरोध झाला पाहिजे. असे जर झाले नाही तर ब्राम्हण लोकांच्या कटकारस्थानाला बहुजन समाजाचे तरुण बळी पडतील. हिंदू हा शब्द गुलामी से प्रतीक आहे तो शब्द आपण आत्ताच झुगारला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com