कर्डिलेंच्या मुलाच्या साखरपुड्यात सर्वपक्षीय नेत्यांची मांदियाळी

भाजपचे ( BJP ) ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री शिवाजी कर्डिले ( Shivaji Kardile ) यांचा मुलगा अक्षय व राजेंद्र कासार (रा. कापूरवाडी, ता. नगर) यांची मुलगी प्रियंका यांचा साखरपुडा थाटामाटात पार पडला.
अक्षय कर्डिले यांच्या साखरपुड्याला उपस्थित असलेले मान्यवर
अक्षय कर्डिले यांच्या साखरपुड्याला उपस्थित असलेले मान्यवरसरकारनामा
Published on
Updated on

अहमदनगर : मोठ्या राजकीय नेत्यांच्या मुला-मुलींचे लग्न, साखरपुडा अशा कार्यक्रमांना राजकीय मान्यवरांची मांदियाळी असते. असाच एका कार्यक्रमाचा प्रत्यय काल ( बुधवारी ) नगर शहरात आला. Leaders of all parties in Cordille's son's sugarplum

भाजपचे ( BJP ) ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री शिवाजी कर्डिले ( Shivaji Kardile ) यांचा मुलगा अक्षय व राजेंद्र कासार (रा. कापूरवाडी, ता. नगर) यांची मुलगी प्रियंका यांचा साखरपुडा थाटामाटात पार पडला. या सोहळ्यात जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांची मांदियाळी होती.

अक्षय कर्डिले यांच्या साखरपुड्याला उपस्थित असलेले मान्यवर
हे नेते अजूनही तरुण ! मुरकुटे- कर्डिले यांची रस्त्यातच कुस्ती

बंधन लॉन येथे हा सोहळा काल (बुधवारी) पार पडला. खासदार डॉ. सुजय विखे, आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कृतिसमितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, देवगड देवस्थानचे अध्यक्ष भास्करगिरी महाराज, माजी मंत्री राम शिंदे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, महापौर रोहिणी शेंडगे, आमदार अरुण जगताप, संग्राम जगताप व मोनिका राजळे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी आमदार भानुदास मुरकुटे व बाळासाहेब मुरकुटे, अनुराधा नागवडे, पारनेरचे सभापती गणेश झावरे, प्रशांत गायकवाड, जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष कानडे, अमोल राळेभात, जयदत्त धस, दत्तात्रय पानसरे, जिल्हा परिषद सदस्य, यांसह सर्व नगरपालिकांचे नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अक्षय कर्डिले यांच्या साखरपुड्याला उपस्थित असलेले मान्यवर
अक्षय कर्डिलेंची मोठी घोषणा : राजकारणाचा नवा डाव ठरला

मान्यवरांच्या भेटीने हा राजकीय चर्चेचा विषय ठरला. भाजपचे शहर व तालुक्यातील नेते दिवसभर या परिसरात दिसून आले. आमदार संग्राम जगताप व त्यांच्या कार्यकर्त्यांनीही कार्यक्रमात दिवसभर उपस्थिती होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com