Koregaon News : अखंड भारत तोडण्याचे षडयंत्र हाणून पाडूया : शशिकांत शिंदे

Koregaon Muslim Society कोरेगाव बाजारपेठ परिसरातील शिंदे गार्डनमध्ये आयोजित मुस्लिम बांधवांच्या इफ्तार पार्टीमध्ये आमदार शिंदे बोलत होते.
MLA Shashikant Shinde at the Iftar party
MLA Shashikant Shinde at the Iftar partykoregaon
Published on
Updated on

-पांडुरंग बर्गे

Shashikant Shinde News : आज १४० कोटी लोकसंख्येच्या भारताचे विभाजन करण्याचे, तोडण्याचे प्रयत्न षडयंत्र सातत्याने एका शक्तीकडून सुरू आहेत. परंतु, एकीच्या जोरावर हा प्रयत्न आपण सर्वांनी हाणून पाडून तिरंगी झेंड्याखाली अखंड भारत एकत्र ठेवूया, असे आवाहन आमदार शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांनी केले.

कोरेगाव तालुका व कोरेगाव शहर राष्ट्रवादी काँगेस अल्पसंख्यांक सेलच्या वतीने रमजान महिना रोजेनिमित्ताने येथील बाजारपेठ परिसरातील शिंदे गार्डनमध्ये आयोजित मुस्लिम बांधवांच्या इफ्तार पार्टीमध्ये आमदार शिंदे बोलत होते.

मुस्लिम समाजावर वेगवेगळ्या मार्गाने होत असलेला अन्याय आपण सर्वांनी एकी ठेवून त्याचे परिमार्जन करूया. एकीचा कोरेगावातील हा संदेश आपण सर्वत्र पोहचवूया, असे सांगून, आमदार शिंदे यांनी आपण इथे आमदार झाल्यापासून पार्टीची ही परंपरा सुरू केली. मागील दोन वर्षे कोरोनामुळे खंड पडला. आता पुन्हा ती परंपरा सुरू केली असून, भविष्यात ती कायम राहील."

MLA Shashikant Shinde at the Iftar party
Koregaon News : महेश शिंदे म्हणाले, शशिकांत शिंदेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी; अपयश जनतेच्या माथी मारतात...

शफीक शेख म्हणाले, "शशिकांत शिंदे यांनी मुस्लिम बांधवांना कायम पाठबळ दिले असल्याने आपणही त्यांच्या पाठीशी कायम आहोत तद्वतच यापुढेही राहू या. शशिकांत शिंदे यांच्यावर तर शिंदे यांचे मुस्लिम बांधवांवर दृढ प्रेम असून, ते यापुढेही कायम रहावे. प्रत्येक मुस्लिम बांधवाची हजला जाण्याची इच्छा असते ती पूर्ण होवो अशा सदिच्छा."

MLA Shashikant Shinde at the Iftar party
Shashikant Shinde Vs Mahesh Shinde: साताऱ्यात राजकारण तापलं; जिहे-कटापूर पाणी योजनेवरुन शशिकांत शिंदे- महेश शिंदेंमध्ये जुंपली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com