Koregaon News : महेश शिंदे म्हणाले, शशिकांत शिंदेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी; अपयश जनतेच्या माथी मारतात...

Mahesh Shinde सातारा शासकिय विश्रामगृहात महेश शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार शिंदेंनी काल केलेल्या टीकेला प्रतिउत्तर दिले.
Mahesh Shinde, Shashikant Shinde
Mahesh Shinde, Shashikant Shindesarkarnama
Published on
Updated on

सातारा : रामोशीवाडीच काय हा सगळाच भाग ७५ वर्षे टॅंकरने पाणी पितोय. २५ वर्षे त्यांची एकहाती सत्ता होती. दहा वर्षे त्यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केलंय. त्यावेळी त्यांचे हात कोणी बांधले नव्हते. तुम्ही जलसंपदा मंत्री होता, आज तेथे टॅंकर चालु आहे म्हणायला तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. तुमचे अपयश जनतेच्या माथी मारताय, असा घाणाघात करुन यांची अवस्था शोलेतील आसरानी सारखी झाली आहे. सत्तेत होता, त्यावेळी तुम्हाला मतदारसंघातील जनता दिसली नाही. आता आसरानीच्या भूमिकेत जाऊन तुम्ही काहीही करु शकत नाही, असा सणसणीत टोला कोरेगावचे आमदार महेश शिंदे Mahesh shinde यांनी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदेंना Shashikant shinde लगावला.

कोरेगाव तालुक्यातील वर्धनगड येथील जिहे-काटापूर पाणी योजनेचा आउटलेट वॉल रात्रीच्या अंधारात बंद करण्याचा प्रयत्न पोलिस प्रशासन आणि जिहे- कटापूर योजनेच्या अधिकाऱ्यांनी केला होता. याला रामोशीवाडीच्या नागरिकांनी विरोध करत हा प्रयत्न हाणून पाडला होता. स्थानिक आमदार सुडाचे आणि दुष्ट प्रवृत्तीचे राजकारण करत आहेत.

Mahesh Shinde, Shashikant Shinde
Satara News : मी आव्हानांना भीक घालत नाही : उदयनराजेंचा अजितदादांना टोला

आमदार महेश शिंदे पोलिसांवर आणि प्रशासनावर दबाव टाकत आहेत. दिवसा कामे करणारे अधिकारी रात्री चोरासारखी का कामे करत आहेत, असा सवाल आमदार शशिकांत शिंदेंनी उपस्थित करत याचा खुलासा जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी करावा. अन्यथा तुमच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची तयारी आम्हाला करावी लागेल असा इशारा त्यांनी दिला होता.

Mahesh Shinde, Shashikant Shinde
Koregaon News : राज्यात सरकार पुरस्कृत दहशतवाद; उपमुख्यमंत्र्यांकडूनच काडतुस घुसण्याची भाषा : शशिकांत शिंदे

सातारा शासकिय विश्रामगृहात महेश शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार शिंदेंनी काल केलेल्या टीकेला प्रतिउत्तर दिले. महेश शिंदे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी चार महिन्यात आत सर्व्हेक्षण करुन पाणी उपलब्ध करा, असे सांगितले आहे. हे उपलब्ध पाणी या भागापर्यंत पोचविण्यासाठी २१० कोटींचे टेंडर खरोटे आणि कंपनीला दिले आहे. त्याची वर्क ऑर्डर चार दिवसात निघेल. त्या कुपनलिकेतून या गावांना पाणी मिळणार आहे.

Mahesh Shinde, Shashikant Shinde
Koregaon News: महेश शिंदेंचे प्रयत्न; कोरेगावसाठी अर्थसंकल्‍पातून ११४ कोटींचा निधी

मला चुकीचे राजकारण करुन या लोकांना त्रास द्यायचा नाही. मी जनतेला फसवत नाही. सत्य आहे ते सांगून त्यापद्धतीने काम करतोय. तुम्ही सुडाचे राजकारण करताय असा आरोप शशिकांत शिंदेंनी केला आहे. त्यावर महेश शिंदे म्हणाले, त्याचे राजकारण त्यांच्या कुटुंबाच्या अर्थकारणापुरते मर्यादित होते. त्यांच्या नेत्यांच्या कुटुंबासाठी फायदेशीर होतं.

Mahesh Shinde, Shashikant Shinde
Patan : शंभूराज देसाई कार्यकर्त्यांना घडवताहेत विमान प्रवास....

आज मी त्यांचे अर्थकारण व त्यांच्या सगळ्या चोऱ्या थांबल्या, त्यामुळे त्यांना वाटतंय की मी सुडाचे राजकारण करतोय. जनतेच्या हितासाठी जे करावे लागेल ते करणार त्यांना काय वाटाचे वाटू देत. महेश शिंदे म्हणाले, रामोशवाडी काय सगळाच भाग ७५ वर्षे टॅंकरने पाणी पितोय. २५ वर्षे तुमची एकहाती सत्ता आहे, दहा वर्षे नेतृत्व केलंय तुमचे हात कोणी बांधले नव्हते.

Mahesh Shinde, Shashikant Shinde
Koregaon market committee : पक्षाअंतर्गत खो-खो, कबड्डीचा खेळ नको; रामराजे नाईक-निंबाळकर स्पष्टच बोलले

तुम्ही जलसंपदा मंत्री होता, आज तुम्हाला लाज वाटायला पाहिजे की तेथे टॅंकर चालु आहे म्हणायला. तुमचे अपयश जनतेच्या माथी मारताय. मी फक्त तीन वर्षे झाले आमदार झालो. आतापर्यंत खटाव तालुक्यातील दुष्काळ संपवलाय. आता भाडळे खोऱ्यातील दुष्काळ संपवत आहे. रामोशवाडीचाही दुष्काळी महेश शिंदेंच संपविणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हा दुष्काळ संपविणार आहे.

Mahesh Shinde, Shashikant Shinde
Pune Loksabha Seat : पुणे लोकसभा पोटनिवडणुकीवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत जुंपली!

सोमवारी त्यांनी आंदोलनाच्या इशऱ्यावर महेश शिंदे म्हणाले, उद्योगच काय त्यांना लाठी आंदोलन घेतलं. कुठली माणसं आली होती. एक जण म्हणाला काठी हाणा, दुसरा म्हणाला आत घालतील पळून जावा. यांची अवस्था शोलेतील आसरानी सारखी झाली आहे. आधे इधर आधे उधर जाओ बाकी के मेरे पिछे...अशी अवस्था त्यांची झाली असून राजकारणातील आसरानी झाले आहेत.

Mahesh Shinde, Shashikant Shinde
Narendra Modi Safari Look : पंतप्रधान नरेंद्र मोदींची जंगल सफारी; पाहा खास फोटो!

काळजी करुन नका आंदोलनातून काहीही होतही. ज्यावेळी तुम्ही सत्तेत होता, त्यावेळी तुम्हाला मतदारसंघातील जनता दिसली नाही. आता आसरानीच्या भूमिकेत जाऊन तुम्ही काहीही करु शकत नाही. जनतेचा आमच्यावर विश्वास आहे. कोरेगाव मतदारसंघात वाड्यावस्त्यावर आश्वासक व दर्जेदार कामे आम्ही केली आहेत. रिझल्ट ओरिएंटेड कामे करणारी माणसे असून आगामी काळात दृश्य विकास दिसेल.

Mahesh Shinde, Shashikant Shinde
Eknath Shinde Ayodhya Tour : मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वाला नवा आयाम देणारा अयोध्या दौरा; बघा फोटो

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com