BJP Leader's Claim : शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसही संपणार : भाजपच्या बड्या नेत्याचा धक्कादायक दावा

राष्ट्रवादी पक्षच शिल्लक राहणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री काय किंवा मंत्री काय त्यांना काहीच मिळणार नाही.
Ranjitsinh Naik Nimbalkar
Ranjitsinh Naik NimbalkarSarkarnama

पंढरपूर : ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (Shivsena) संपली, त्या प्रमाणेच येत्या काळात राष्ट्रवादी काॅंग्रेससुद्धा (NCP) संपेल, असे धक्कादायक वक्तव्य माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी केले आहे. खासदार निंबाळकर (Ranjitsinha Naik Nimbalkar) यांच्या वक्तव्यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. (Like Shiv Sena, NCP too will end : Ranjitsinh Naik Nimbalkar)

Ranjitsinh Naik Nimbalkar
Kasba By Election : रूपाली पाटील-ठोंबरे नव्या वादात : धंगेकरांना मतदान करतानाचा फोटो केला शेअर

खासदार निंबाळकर यांच्या उपस्थितीत माढा तालुक्यातील भीमानगर येथे नीरा देवघर आणि उजनी धरणाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्या नंतर पत्रकारांशी बोलताना खासदार निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाना साधला.

Ranjitsinh Naik Nimbalkar
Kasba By Election : राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील-ठोंबरेंनी ‘त्या’ फोटोबाबत दिले ‘हे’ स्पष्टीकरण

मुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये पोस्टर वाॅर सुरु आहे. याविषयी खासदार निंबाळकर यांना विचारले असता, मुख्यमंत्रीपदासाठी महाराष्ट्रात असे अनेक मुंगेरीलाल आहेत, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची खिल्ली उडवली. मुख्यमंत्रीपदासाठी स्वप्न पाहणे, हा त्यांचा मुलभूत अधिकार आहे.

Ranjitsinh Naik Nimbalkar
Ajit Pawar Vs Rane : राणेंचे चॅलेंज राष्ट्रवादीने स्वीकारले; बारामतीत येऊन पवारांचे १२ वाजून दाखविण्याचे दिले प्रतिआव्हान

जी शिवसेना बस्ट झाली आहे. शिवसेना पक्षही राहिला नाही आणि चिन्हही राहिले नाही. त्या प्रमाणेच या पुढच्या काळात राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाची अवस्था होणार आहे. राष्ट्रवादी पक्षच शिल्लक राहणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री काय किंवा मंत्री काय त्यांना काहीच मिळणार नाही. पक्ष जिवंत राहावा, यासाठी त्यांची शेवटची धडपड सुरु असल्याचेही खासदार निंबाळकर म्हणाले. या वेळी भाजपचे सुहास पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com