Loksabha Election 2024 : आता एकच लक्ष्य; राज्यसभा सदस्य उदयनराजेंनी स्पष्टच सांगितलं...

Udayanraje Bhosale : 22 जुलै 2020 रोजी राज्यसभेची शपथ घेतलेल्या खासदार उदयनराजेंनी कोणती इच्छा व्यक्त केली?
Udayanraje Bhosle
Udayanraje BhosleSarkarnama

Satara Political News :

खासदार उदयनराजे भोसले यांनी आज वाढदिवसाच्या निमित्ताने भवानी मातेचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. आणि आजपासून खऱ्या अर्थानं त्यांच्या लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात झाली. त्यावर त्यांनी त्यांची भूमिकाही स्पष्ट केली.

प्रत्येकाच्या मनात इच्छा असते. त्यात गैर काहीही नाही. मलाही वाटतं की, आपण लोकांच्या माध्यमातून 'त्या' सभागृहात जावे, असे उदयनराजे यांनी स्पष्टपणे सांगितले.

खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या वाढदिवसानिमित्त जलमंदिर पॅलेसमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या वेळी भवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी त्यांचे औक्षण केले. या वेळी पत्नी दमयंतीराजे भोसले उपस्थित होत्या. यानंतर उदयनराजेंनी माध्यमांशी मुक्तपणे संवाद साधला.

Udayanraje Bhosle
Loksabha Election 2024 : ‘तुताऱ्या वाजवा नाही; तर मशाली पेटवा...महायुती ४५ पेक्षा जास्त जागा जिंकणार’

संकल्प केवळ वाढदिवसापुरता मर्यादित नसतो. मी सर्वसामान्य माणसाला समोर ठेवून वाटचाल केली आहे. कधीही राजकारण केलं नाही. फक्त जनतेच्या हितासाठी समाजकारणच केलं, असा दावा या वेळी खासदार उदयनराजे यांनी केला.

छत्रपती शिवाजी महाराजांची कल्पना, सर्वधर्म समभावाच्या विचारानं मी वाटचाल केली आहे. कधीही जातीधर्मात भेदभाव केला नाही. देश अखंड ठेवायचा असेल तर प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपण बंधुत्वाच्या भावनेतून राहणे गरजेचं आहे. नाहीतर युनायटेड स्टेटस॒ ऑफ अमेरिका आहे, तसेच आपल्याकडे होऊ नये, याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे, असं आवाहन त्यांनी या वेळी केलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शुभेच्छा देण्यासाठी जलमंदिर पॅलेसमध्ये आले होते. ते काय घोषणा करतील का, यावर उदयनराजे म्हणाले, मुख्यमंत्री काय घोषणा करतील मला माहीत नाही. पण येथे येतात हे त्यांचं मोठेपण आहे. आमचे त्यांच्याशी वैयक्तिक संबंध आहेत. आता जरी ते मुख्यमंत्री असले तरी आमदार असल्यापासूनचे आमचे संबंध आहेत. महाबळेश्वरला नाट्यपरिषद होत आहे, त्यामुळे ते येत होते, त्यांना आम्ही भेट घेण्याची विनंती केली. त्यानुसार ते आले, असे त्यांनी सांगितले.

वाढदिवसाच्या निमित्ताने सातारा लोकसभा निवडणुकीच्या (Satara Loksabha Constituency) मोहिमेस सुरुवात झाली असे म्हणता येईल का? यावर उदयनराजे म्हणाले, मोहीम सुरू झाली म्हणता येईल. निवडणूक लढावी ही प्रत्येकाच्या मनात इच्छा असते. त्यात गैर काहीही नाही. वाटतं की आपण लोकांच्या माध्यमातून त्या सभागृहात जावे, असं सांगत लोकसभेत (Loksabha Election) जाण्याची इच्छा व्यक्त केली.

(Edited by Avinash Chandane)

R

Udayanraje Bhosle
Satara-Karad Railway : पाठपुरावा शरद पवारांच्या खासदाराचा अन् कामांचा शुभारंभ मोदींच्या हस्ते...!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com