Loksabha Election 2024 : ‘तुताऱ्या वाजवा नाही; तर मशाली पेटवा...महायुती ४५ पेक्षा जास्त जागा जिंकणार’

Chandrakant Patil News : महाविकास आघाडीच्या जागावाटपाबद्दल बोलायला मी ज्योतिषी नाही, पण महाविकास आघाडीत समाधानाचे वातावरण दिसत नाही.
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama

Solapur News : तुताऱ्या वाजवा नाही, तर मशाली पेटवा. महाराष्ट्रात आम्ही पूर्वी 45 जागा जिंकणार म्हणत होतो. पण, आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही तोही क्रॉस करू, असा विश्वास सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवला. (Mahayuti News)

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी लोकसभेला महायुती तब्बल 45 पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा दावा केला आहे. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता वाढत आहे. मोदी हे जात, पात, धर्म, गट यांच्यापुढे गेलेले आहेत. मोदींनी लाभार्थी नावाचा गट निर्माण केला आहे आणि तो असा म्हणतो की, विरोधी पक्षांचे राजकारण आता बास. आम्हाला फक्त मोदी पाहिजे. त्याचा प्रत्यय आता दिसत आहे. (Solapur Political news)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chandrakant Patil
Shivrajsingh Chouhan News : शिवराजसिंह चौहानांना कोल्हापुरी पायताणाची भुरळ, अंबाबाईचे दर्शन घेऊन दुकानात शिरले...

दोन महिन्यांपूर्वी झालेल्या देशातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुका, तीन राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला यश मिळाले. मध्य प्रदेशच्या इतिहासात भाजपला प्रथमच एवढे मोठे यश मिळाले आहे. ‘हमको लाभ मिला है, तुम्हे जो करना, है तो करो’. पण, निवडणुकीत शेवटपर्यंत विरोधी पक्षाने हार मानायची नसते, असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना दिला. (Maharashtra politics)

चंद्रकांत पाटील म्हणाले, विरोधी पक्ष किंवा शरद पवारही म्हणतात की, आमच्या 20-22 जागा लोकसभेला येणार आहेत. मात्र, राज्यात महायुती 48 पर्यंत जाईल, असे वाटते

महाविकास आघाडीच्या जागावाटपावरही चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले. ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या जागावाटपाबद्दल बोलायला मी ज्योतिषी नाही, पण महाविकास आघाडीत समाधानाचे वातावरण दिसत नाही. मात्र, त्याकडे आम्ही बघत नाही. याउलट महायुती मजबूत होत चालली आहे. कालचा जो रिपोर्ट आहे, त्यात भाजपला 36 टक्के मते दाखवत आहे. सहयोगी पक्षांसोबत 44 टक्क्यांपर्यंत मतांचा आकडा जात आहे. आमच्या महायुतीच्या मतांचा आकडा 44 टक्क्यांपर्यंत गेला, तर आम्हाला 48 जागा मिळायला पाहिजेत.

Chandrakant Patil
Solapur Politics : शहाजीबापू अन्‌ आवताडेंना सावंतांचा सूचक इशारा; बाबासाहेब देशमुख, भालकेंचे केले कौतुक!

उद्धव ठाकरे यांच्या मशालीला जर तेल मागितले, तर भाजप देईल का या प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांनी सावध भूमिका घेतली. मशालीला तेल मागणे न मागणे हे जर तरचे विषय आहेत. मात्र, तुताऱ्या वाजवा नाही तर मशाली पेटवा, महाराष्ट्रात आम्ही 45 जागाही क्रॉस करणार आहोत, असा दावा चंद्रकांतदादांनी केला.

R

Chandrakant Patil
Maratha Reservation : '...त्यामुळे मराठा समाजाने स्वतःचे मोठे नुकसान करून घेतले आहे'; चंद्रकांतदादांना पंढरपुरात घेराव

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com