
कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आजी-माजी आमदारांमध्ये अंतर्गत मतभेद उफाळले आहेत.
माजी आमदार राजेश पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना पक्षातील जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विसर न पडण्याचा सल्ला दिला.
शक्तिपीठ महामार्गाविषयी चंदगडमध्ये जबरदस्ती टाकली जाऊ नये, अशी भूमिका पाटील यांनी स्पष्ट केली.
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे एकहाती नेतृत्व गेल्या अनेक वर्षापासून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हेच करीत आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून माजी आमदार राजेश पाटील विजयी झाले. मात्र एकदाच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यामुळे राष्ट्रवादीचा नेतृत्व पुन्हा एकदा मंत्री मुश्रीफ यांच्याकडे आले.
अशातच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात राष्ट्रवादीमध्ये अनेक नेत्यांचे पक्षप्रवेश होत आहेत. त्यावरून मात्र माजी आमदार राजेश पाटील यांनी मंत्री मुश्रीफ यांचेच कान टोचले आहेत.
चंदगड मतदारसंघातील कार्यकर्ते पक्षनिष्ठा मानून काम करणारे आहेत. खैरात म्हणून पक्षाकडून त्यांनी काहीच मागितले अथवा घेतलेही नाही. राधानगरी, भुदरगड व करवीर तालुक्यांत जाहीर प्रवेशाद्वारे पक्ष जरूर वाढवा. पण, १९९९ मध्ये स्थापनेपासून पक्षाशी निष्ठावंत असणाऱ्यांचा विसर पडू देऊ नका. चंदगडला न्याय देण्याची भूमिका कधी घेणार आहे की नाही. प्रामाणिक कार्यकर्त्यांना न्याय, ताकद देण्याची भूमिका मंत्री मुश्रीफ यांनी घ्यावी’, असे आवाहन माजी आमदार राजेश पाटील यांनी केले.
पाटील म्हणाले, ‘आमदारकी निवडणुकीतील पराभवाची मरगळ झटकून कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकांसाठी सज्ज झाले पाहिजे. पुन्हा एकदा पक्षाचे संघटन वाढविण्यास येणाऱ्या निवडणुका महत्त्वपूर्ण आहेत. असे सांगत शक्तिपीठ महामार्गाबद्दल राजेश पाटील यांनी महत्त्वाची भूमिका मांडली.
चंदगडच्या आमदारांनी शक्तिपीठची मागणी केली. मुळात कागलमधून जाणाऱ्या या महामार्गाला तेथे विरोधाची भूमिका घेतलेल्या कागलकरांनी, शेतकऱ्यांना हवे असेल, तर चंदगडमधून शक्तिपीठ जाऊ शकतो, असे जाहीर वक्तव्य करण्याची भूमिका योग्य वाटली नाही. जबरदस्तीने शक्तिपीठ चंदगडच्या माथी मारू नका. असेही माजी आमदार पाटील म्हणाले.
Q1: कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणते मतभेद आहेत?
A1: आजी-माजी आमदारांमध्ये नव्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशावरून मतभेद झाले आहेत.
Q2: राजेश पाटील यांनी मंत्री मुश्रीफ यांना काय सल्ला दिला?
A2: पक्षाशी निष्ठावंत जुन्या कार्यकर्त्यांना विसरू नका, असा सल्ला दिला.
Q3: राजेश पाटील यांनी कोणत्या महामार्गावर आक्षेप घेतला?
A3: चंदगडमधील शक्तिपीठ महामार्गावर जबरदस्ती करू नये, असे ते म्हणाले.
Q4: स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबत पाटील यांची भूमिका काय आहे?
A4: कार्यकर्त्यांनी निवडणुकांसाठी सज्ज व्हावे आणि पक्ष संघटन मजबूत करावे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.