Local Self-Government News : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आशेने इच्छुक कंगाल, वर्गणी देऊन झोळी झाली रिकामी !

Kolhapur Lok Sabha Constituency : गणेशोत्सव असो किंवा शिवजयंती असो प्रत्येक सार्वजनिक तरुण मंडळाकडून इच्छुकांना साकडे घातले जात आहे. कोणीही आपल्याकडून नाराज होऊ नये, याची खबरदारी इच्छुक...
Local  Elections
Local ElectionsSarkarnama

Kolhapur News : कोल्हापूर महानगरपालिकेतील चार वर्षाचा प्रशासक कार्यकाळ संपल्यानंतर ही अजूनही कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रतीक्षा इच्छुकांना लागून राहिली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागतील, अशी आशा इच्छुक आणि आजी-माजी नगरसेवकांना आहे. 2020 नंतर कोरोना आणि ओबीसी आरक्षणाचे कारण देत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.

एकदा नव्हे तर तीन वेळा आरक्षण सोडत काढल्यानंतरही निवडणूक आज लागेल? उद्या लागेल? या आशेवर अनेकजण आहेत. तर इच्छुकांनी केलेली तयारी पाहता गणेशोत्सव, शिवजयंती, दहीहंडी यासह विविध उपक्रमात सार्वजनिक तरुण मंडळावर केलेला वारेमाप खर्चामुळे इच्छुकच आता कंगाल झाले आहेत.राज्यातील सर्वच महानगरपालिका, पंचायत, नगरपंचायत, नगरपालिका,जिल्हा परिषद, आणि सार्वजनिक संस्थांवरील लोकप्रतिनिधींची मुदत संपली आहे तर काहींची संपत आली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची 15 नोव्हेंबर 2020 रोजी मुदत संपली आहे. गेल्या चार वर्षांपासून कोल्हापूर महानगरपालिकेवर प्रशासक राज आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Local  Elections
Kolhapur Lok Sabha Election : तीन उमेदवारांचा खर्च अर्धा कोटींवर, अंतिम तपासणीत धैर्यशील माने आघाडीवर

कोल्हापूर (Kolhapur) जिल्हा परिषदेत सोबत 22 पंचायत समितीची मुदत ही संपली आहे. निवडणूक आज लागेल उद्या लागेल अशा अशाने इच्छुकांनी आपली तयारी कायम ठेवली आहे. कोणताही घटक आपल्यापासून नाराज होऊ नये यासाठी आलेल्या नागरिकांना आर्थिक मदतीपासून ते सामाजिक क्षेत्रातील विविध घटकांवर मदत करण्याचे काम सुरू आहे. त्यातच इच्छुकांना पैसे खर्च करावे लागत आहेत.गणेशोत्सव असो किंवा शिवजयंती असो प्रत्येक सार्वजनिक तरुण मंडळाकडून इच्छुकांना साकडे घातले जात आहे. कोणीही आपल्याकडून नाराज होऊ नये, याची खबरदारी इच्छुक घेताना दिसत आहेत.

गेल्या चार वर्षात तीन वेळा प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत घेतली आहे. मतदार यादी ही तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे इच्छुकांना ही निवडणूक लवकर लागावी अशी आशा आहे. पण ओबीसी आरक्षणामुळे या निवडणुकांचे घोंगडे सुप्रीम कोर्टात (Court) भिजत आहे. पण गेल्या साडेतीन वर्षात इच्छुकांनी तयारी केली पण झोळी रिकामी होण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

गेल्या साडेतीन वर्षात जवळपास एका इच्छुकांकडून एक एक कोटीची खैरात या सर्व उपक्रमावर झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक घ्यावा असा तबाव गट तयार होत आहे.ओबीसी आरक्षणाचा मुद्दा संपल्यानंतर प्रभाग रचनेच्या मुद्द्यांवर न्यायालयात निकाल प्रलंबित आहे. परंतु हा मुद्दा गौण आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक झाल्यानंतरच यावर निर्णय होणे अपेक्षित आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Local  Elections
Vasant More News : निवडणूक झाली वसंत मोरे 'वंचित'मध्येच राहणार का? स्वतःच दिलं उत्तर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com