Lok Sabha Election 2024 : शेवटच्या दिवशी कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांचा रोड शो; भर उन्हात हजारो शिवसैनिक रस्त्यावर

Kolhapur Lok Sabha Election 2024 : कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी विशेष जोडण्या लावण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून सुरू आहे.
eknath shinde campain kolhapur
eknath shinde campain kolhapursarkarnama

Kolhapur News, 5 May : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात ( Kolhapur ) भव्य रोडशो केला. कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'टू व्हीलर रॅली'त सहभागी घेऊन महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याची आवाहन केले. यावेळी शिवसैनिकांनी केलेली गर्दी पाहता अवघे शहर भगवेमय झाल्याचे चित्र होते. सांयकाळी प्रचाराची सांगता होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लावलेली उपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याकडून या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

पश्चिम महाराष्ट्रात सर्वात महत्त्वाचे आणि राज्यात चर्चेचा विषय ठरलेली कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची ( Kolhapur Lok Sabha Election ) निवडणूक अत्यंत चुरशीची आणि अटीतटीची समजली जाते. महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती ( Shahu Maharaj Chhatrapati ) आणि महायुतीकडून खासदार संजय मंडलिक ( Sanjay Mandlik ) यांना उमेदवारी मिळाली आहे. गेल्या पंधरा दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चार वेळा कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शनिवार पुन्हा ते कोल्हापूर दौऱ्यावर येऊन कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी विशेष जोडण्या लावण्याचा प्रयत्न करत असल्याचेही चित्र आहे. प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक असताना राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या वतीने करण्यात आलेल्या टू व्हीलर रॅलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभाग घेत उपस्थितांची मने जिंकली.

eknath shinde campain kolhapur
Eknath Shinde : बालेकिल्ल्यात कमी पण लाडक्या कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांचे सतत दौरे; शिवसैनिकांमध्ये उर्जा...

प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. उन्हाचा प्रचंड तडाका असतानाही शिवसैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी रस्त्यावर दाखल झाले आहेत. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे दोन्ही उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी या दोन्ही जागा मिळवून हात बळकट करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले.


( Edited By : Akshay Sabale )

eknath shinde campain kolhapur
Raju Shetti News : "पोलिसांनो! जे करायचं ते करा"; स्वाभिमानीच्या शिलेदारांना नोटिसा आल्यानंतर शेट्टी भडकले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com