Shahajibapu Patil News : फडणवीसांनी राजमार्ग दाखवला अन् शिवसेनेत प्रवेश केला; शहाजीबापू पाटलांचा गौप्यस्फोट

shahjibapu patil On Abhijeet Patil : शहाजीबापू पाटील यांनी अभिजित पाटील यांना सांगोल्यातून निवडणूक लढण्याची ऑफरही दिली आहे.
devendra fadnavis shahajibapu patil
devendra fadnavis shahajibapu patil sarkarnama

Solapur News, 5 May : 2014 साली देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी शिवसेनेत जाण्यास सांगितलं. त्यामुळे शिवसेनेत प्रवेश केला. पण, हा प्रवेश कुणालाच आवडला नाही, असा गौप्यस्फोट आमदार शहाजीबापू पाटील यांनी केला आहे. या शहाजीबापू यांच्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. माढ्याचे उमेदवार रणजितसिंह मोहिते-पाटील, सोलापूरचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ पंढपुरातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली.

श्री विठ्ठल सहकारी कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील ( Abhijeet Patil ) यांनी प्रचारसभेचं आयोजन केलं होतं. यावेळी रासपचे अध्यक्ष महादेव जानकर ( Mahadev Jankar ), माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, सोलापूरचे उमेदवार राम सातपुते ( Ram Satpute ) आणि महायुतीतील अन्य नेते उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शहाजीबापू पाटील ( ShahajiBapu Patil ) म्हणाले, "सांगोल्यात शिवसेनेच्या उमेदवाराला 2004 मध्ये 1300 मते, 2009 मध्ये 1100 मते पडली होती. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला राजमार्ग दाखवला. फडणवीसांनी सांगितलं, 'भाजपकडून तिकीट जुळत नाही, शिवसेनेत जावा.' मग मी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, हा प्रवेश कुणालाच आवडला नाही. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत धनुष्यबाणाला 76 हजार मते पडली. चार महिन्यांमध्ये हे मतदार वाढवले. आमच्याकडं पैसा, कारखाना काय, साधी पिठाची गिरणी नाही."

यावेळी अभिजित पाटील यांना सांगोल्यातून विधानसभा लढण्यासाठी शहाजीबापू पाटील यांनी ऑफर दिली. "आमच्या खुर्च्यां पुढं तुमच्या ( अभिजित पाटील ) ताब्यात यायच्या आहेत. नाही पंढरपुरातून कोणी तिकीट दिलं, तर सांगोल्याला चला. माझे गुडघे काम करत नाहीत. लग्नात भाच्याच्या मागे मामा उभे राहतो... तसाच मी अभिजित पाटील यांच्या पाठिमागे उभा आहे. कुणी सांगोल्यातून निवडून आणलं नाही, तर वडिलांचं नाव लावणार नाही. तुमच्या सगळ्या इच्छा आकांशा देवेंद्र फडणवीस पूर्ण करतील," असंही शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं आहे.

devendra fadnavis shahajibapu patil
Abhijeet Patil : अभिजित पाटलांचा फडणवीसांना जाहीर सभेत शब्द; ‘आत एक अन्‌ बाहेर एक...’

"अभिजित पाटील बंद पडलेला कारखाना चालवायला घेतात आणि सुरू करतात. देवेंद्र फडणवीस यांनी आता निवांत रहावं. महाराष्ट्रातील बंद पडलेल्या कारखान्याची यादी करून अभिजित पाटील यांच्या हातात द्यावी. नाही सगळे कारखाने चालवले, तर पुढच्या आमदारकीच उभं राहणार नाही," अशी फटकेबाजी शहाजीबापू पाटील यांनी केली आहे.

devendra fadnavis shahajibapu patil
Shahajibapu Patil News : अभिजित पाटलांसाठी शहाजीबापूंची राजकीय बलिदानाची तयारी; पंढरपुरात केलं मोठं विधान

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com