Shahajibapu Patil News : "अकलूजला रावणं जन्माला आली आणि आमच्या उरावर बसली", शहाजीबापूंची मोहिते-पाटलांवर जहरी टीका

Shahajibaput Patil On Mohite Patil News : 50 वर्षे झालं मोहिते-पाटलांनी पाणी अडवलं, असा आरोपही शहाजीबापू पाटलांनी केला आहे.
Shahajibapu Patil
Shahajibapu Patilsarkarnama
Published on
Updated on

माढा लोकसभा मतदारसंघातील ( Madha Lok Sabha Election ) राजकीय वातावरण तापलं आहे. नाईक-निंबाळकर आणि मोहिते-पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. यातच शिवसेना ( शिंदे गट ) आमदार शहाजीबापू पाटील यांनी मोहिते-पाटील यांच्यावर रावण म्हणत हल्लाबोल केला आहे. अकलूजला रावणं जन्माला आली आणि आमच्या उरावर बसली, अशी जहरी टीका शहाजीबापू पाटलांनी मोहिते-पाटलांवर केली आहे.

भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर ( Ranjitsinh Naik Nimbalkar ) यांच्यासाठी आयोजित केलेल्या मेळाव्यात शहाजीबापू पाटील ( Shahjibapu Patil ) बोलत होते. शहाजीबापू पाटील म्हणाले, "रामानं लंकेत बाणाच्या सहाय्यानं रावणाला मारलं. रावण लंकेत मेला आणि त्याचा आत्मा भरकटत, भरकटत अकलूजला आला. इकडे अकलूजला रावणं जन्माला आली आणि आमच्यावर उरावर बसली. आमच्यातही राम नसल्यानं आम्ही पाया पडत बसलो. तरी ही रावणं पुन्हा जन्माला घालू नका. आपल्या सांगोला तालुक्याचं वाटोळं करू नका."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"रामायण आणि महाभारत संपेल, पण मोहिते-पाटील आणि माझा इतिहास संपायचा नाही. 50 वर्ष झालं निरा-उजवा कालव्याच्या चार आणि पाच नंबर फाट्याचं पाणी त्यांनी अडवलं. रणजितसिंह निंबाळकरांनी डाव्याचं पाणी उजव्याला सोडण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घातला होता," असं शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं.

"मला आमदारकीला 500 मतांचं लीड द्या. पण, रणजितसिंह निंबाळकरांना दीड हजारांचं लीड द्यावं. मोहिते-पाटलांनी माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं आहे. माझं घरदार ठेवलं नाही. लेकरांना वनवाशी केलं. याचा तुम्हाला राग येतोय का नाही?" असा सवाल शहाजीबापू पाटलांनी कार्यकर्त्यांना केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com