Madha Lok Sabha Election 2024 : रणजितसिंहांना संधी मिळताच गोरेंनी मोहिते-पाटील अन् रामराजेंना डिवचलं; म्हणाले...

Jaykumar Gore Latest New : "रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना तिकीट मिळू नये, यासाठी अनेक लोकांनी विरोध केला. पण...", असंही जयकुमार गोरेंनी सांगितलं.
jaykumar gore ram ranjitsingh naik nimbalkar dhairyshil mohite patil ramraje naik nimbalkar
jaykumar gore ram ranjitsingh naik nimbalkar dhairyshil mohite patil ramraje naik nimbalkarsarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : 14 मार्च | लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha Election 2024 ) भाजपनं दुसरी तर महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. महाराष्ट्राच्या पहिल्या यादीत खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर ( Ranjitsinh Naik Nimbalkar ) यांना संधी दिली आहे. महायुतीत माढा मतदारसंघात राष्ट्रवादी (अजित पवार गट) की भाजप यामध्ये नक्की कोणाकडे जाणार? याकडे सातारा, सांगलीसह सोलापूर जिल्ह्यातील मतदारांचे लक्ष लागले होते. अखेर माढ्यात अजितदादा गटाला जोरदार धक्का बसला असून, विद्यमान खासदार रणजिंतसिंह नाईक-निंबाळकर यांनी उमेदवारी मिळविण्यात बाजी मारली आहे. यानंतर फलटण येथे आमदार जयकुमार गोरे ( Jaykumar Gore ) यांनी निंबाळकरांना तिकीट मिळू नये म्हणून प्रयत्न करणाऱ्यांना डिवचलं आहे.

jaykumar gore ram ranjitsingh naik nimbalkar dhairyshil mohite patil ramraje naik nimbalkar
Madha Lok Sabha Election 2024 : भाजपने डावललेले मोहिते पाटील माढ्यातून लोकसभा लढवण्याचे धाडस दाखवणार का?

माढा लोकसभा मतदारसंघातून ( Madha Lok Sabha Constituency ) निंबाळकरांना तिकीट मिळताच अकलूजचे मोहिते-पाटील आणि फलटणचे अजित गटातील नेते रामराजे नाईक-निंबाळकर ( RamRaje Naik Nimbalkar ) यांना गोरेंनी लक्ष्य केलं. फलटण- माळशिरस नीरा देवघर प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमात गोरे बोलत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"माढ्याचा खासदार निवडून आणू"

खासदार निंबाळकरांच्या उपस्थितीतल जयकुमार गोरे ( Jaykumar Gore ) म्हणाले, "विद्यमान खासदारांना तिकीट मिळू नये, यासाठी अनेक लोकांनी विरोध केला. अनेकांनी तिकीट मागितले, तो त्यांचा लोकशाहीत अधिकार होता. त्यांना वाटतं मला तिकीट मिळावं, खासदार व्हावं, यामध्ये काही गैर नाही. महायुतीतील माझ्या सहकाऱ्यांचा तिकीट मागायचा अधिकार होता, तो त्यांनी मागितला. आता जो काही निर्णय झाला आहे, त्या निर्णयामागे आम्ही सगळे उभे राहून माढ्याचा खासदार निवडूण आणू."

"पक्षानं टाकलेली जबाबदारी सार्थ करू"

"आज आपल्याला यश मिळाले असून, हा दिवस-क्षण टीका करण्याचा नाही. सध्याच्या क्षणी मिळालेल्या जबाबदारीसाठी प्रचंड मेहनत करावी लागणार आहे. माझ्या मित्राला, भावाला शुभेच्छा देत असताना भाजपच्या वरिष्ठांना मनापासून धन्यवाद देतो. पक्षाने आमच्यावर टाकलेली जबाबदारी सार्थ करू. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचं काम माढा लोकसभा मतदारसंघातील लोकांनी पाहिले आहे. या भागातील रेल्वे, पाण्याचा प्रश्न असो की विकासकामांसाठी रणजितसिंह निंबाळकरांनी मोठे कष्ट घेतले आहेत," असं गोरेंनी सांगितलं.

jaykumar gore ram ranjitsingh naik nimbalkar dhairyshil mohite patil ramraje naik nimbalkar
Ranjeetsingh Nimbalkar News : माढातून पुन्हा रणजितसिंह निंबाळकरच; आता रामराजेंच्या भूमिकेकडे लक्ष!

"इकडे- तिकडे पळण्याचा प्रयत्न करू नका"

"पक्षाच्या बाहेरील काही मंडळींनी तिकीट मिळू नये, अशा पद्धतीची भूमिका घेतली होती. त्यांनाही माझं सांगणं आहे, या गंगेत सामील व्हावं. आता बाहेर इकडे- तिकडे पळण्याचा प्रयत्न करू नये. काही कुठेही गेलात, तरी आपल्याला याच वाटेने जावं लागले. तुम्ही याच वाटेने गेलात तरच यश मिळेल," असे मोहिते-पाटील आणि रामराजे नाईक-निंबाळकरांना गोरेंनी टोला लगावला आहे.

"फडणवीस आणि गोरेंचे आभार मानणार नाही"

खासदार रणजिंतसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानतो. माझ्यावर त्यांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जयकुमार गोरे यांचे आभार मानणार नाही. कारण या दोघांच्या ऋणातून मला उतराई व्हायचं नाही."

R

jaykumar gore ram ranjitsingh naik nimbalkar dhairyshil mohite patil ramraje naik nimbalkar
Lok Sabha Election 2024 : हातकणंगलेत तिरंगी लढतीचा धुराळा ? 'मातोश्री'चा आदेश अन् मविआची सूत्रे वेगाने फिरली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com