Lok Sabha Election 2024 : मनोज जरांगेंना ‘स्वाभिमानी’चे बळ; जालना, बीड लोकसभेसाठी साकडं

Manoj Jarange Patil News : मनोज जरांगेंनी निवडणुकीच्या मैदानात उतरावे, यासाठी प्रकाश आंबेडकरांनीही आग्रह केला आहे. वंचितने त्यांना पाठिंबाही जाहीर केला आहे.  
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama

Sangli News : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करणाऱ्या राज्य सरकार विरोधात प्रत्येक गावातून दोन उमेदवारांनी अर्ज भरण्याची तयारी केली जात आहे. अशातच मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी जालना किंवा बीड लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढविण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना बिनशर्त पाठिंबा देणार आहे. त्यासाठी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी जरांगे-पाटील यांची भेट घेऊन निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला.

लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने जरांगे-पाटील यांची भेट घेतली. खराडे म्हणाले, मनोज जरांगे- पाटील (Manoj Jarange) हे गेली अनेक वर्षे मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) संघर्ष करत आहेत. त्यांच्या लढ्यामुळेच कुणबी मराठा समाजाचा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. राज्यात 53 लाख मराठ्यांना कुणबी आरक्षण मिळणार आहे, हे फार मोठे यश आहे.

Manoj Jarange Patil
Jayant Patil News : जयंत पाटलांचा खुलासा; म्हणाले,'सांगली'च्या उलट-सुलट चर्चेत माझा काय संबंध...?

रस्त्यावर संघर्ष करणारे संघर्ष योद्धे संसदेतही असले पाहिजेत, ही आमची भूमिका आहे,. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) व प्रदेश अध्यक्ष संदीप जगताप यांच्याशी चर्चा करून त्यांना पाठिंबा देणारे लेखी पत्र देण्यात आले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मराठा समाजाच्या आरक्षणाचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी संसद (Parliament) हाच अंतिम मार्ग आहे. त्यामुळे तुम्ही संसदेत गेले पाहिजे. तुम्ही तुमच्या भूमिकेवर पुनर्विचार करावा, असा आग्रह धरण्यात आला. त्यावर योग्यवेळी निर्णय घेऊ, अशी ग्वाही जरांगे-पाटील यांनी दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, महाराष्ट्रातील (Maharashtra) गरीब मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, परंतु सरकारकडून कुणबी प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केली जात आहे. आरक्षणाचा मुद्दा पुढे करीत जाती-जातीत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न महायुतीच्या सरकारकडून केला जात आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून मराठा समाजाच्या दोन उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी चंग बांधला आहे.

मराठा उमेदवारांनी निवडणूक लढवण्यासाठी दबाव वाढत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जरांगेंना बीड अथवा जालना येथून निवडणूक लढवण्याचा आग्रह केला आहे. त्याबाबत ते निश्चित निर्णय घेतील, असा विश्वास खराडे यांनी व्यक्त केला. या वेळी स्वाभिमानीचे जालना जिल्हाध्यक्ष सुरेश काळे, बीडचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास भोसले, राजेंद्र पाटील, भुजंग पाटील, सूरज पाटील, दत्ता भोसले उपस्थित होते.

R

Manoj Jarange Patil
Lok Sabha Election 2024 : ठाकरेंचा पैलवान सांगलीच्या मैदानात अन् महाविकास आघाडीत वाद पेटला; विशाल पाटलांचे काय?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com