Jayant Patil: भाजपचं इंजिन बिघडल्यानं त्यांनी मनसेचं इंजिन सोबत घेतलं; आघाडीचे इंजिन सुसाट...

Jayant Patil Criticized Raj Thackeray: शशिकांत शिंदे हे संसदेत 100 टक्के हजेरी लावतील मात्र महायुतीचे उदयनराजे भोसले हे 5 वर्षात फक्त 6 दिवस संसदेत गेले. लोकसभेत आणि राज्यसभेत आपण ज्यांना निवडून देतो ते जर हजर राहत नसतील तर ते धक्कादायक आहे.
Jayant Patil Criticized Raj Thackeray
Jayant Patil Criticized Raj ThackeraySarkarnama

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे हे महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे विनायक राऊत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज ठाकरेंना डिवचलं आहे.

"भाजपचेचं इंजिन बिघडल्यामुळे त्यांना मनसेचं इंजिन सोबत घ्यावं लागलं," अशी बोचरी टीका जयंत पाटील यांनी केली आहे. "शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांचं इंजिन सुसाट चाललं आहे. त्यामुळे विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे. आपल्या १० ते १५ तरी जागा निवडून येतात का? असा सवाल जयंत पाटलांनी केला.

शशिकांत शिंदे हे संसदेत 100 टक्के हजेरी लावतील मात्र महायुतीचे उदयनराजे भोसले हे 5 वर्षात फक्त 6 दिवस संसदेत गेले. लोकसभेत आणि राज्यसभेत आपण ज्यांना निवडून देतो ते जर हजर राहत नसतील तर ते धक्कादायक आहे. पूर्ण वेळ उपलब्ध असणारा नेता, शंभर टक्के हजेरी लावून आणि प्रश्न विचारू शकणारा उमेदवार आम्ही दिला असल्याची खोचक टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

Jayant Patil Criticized Raj Thackeray
Lok Sabha Election News : राहुल गांधी अन् सिध्दरामैय्या यांच्या व्हिडिओवरून वाद; नड्डा, मालवियांविरोधात तक्रार

शरद पवार हे दुटप्पी भूमिका घेतात, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्याला जयंत पाटलांनी उत्तर दिले. शरद पवार यांनी कधीही दुटप्पी भूमिका घेतलेली नाही. कोल्हापुरात शाहू महाराजांना उमेदवारी घ्या, म्हणून त्यांच्या मागे आम्ही लागलो होतो. तर उदयनराजेंना मात्र दिल्लीला ताटकळत थांबावे लागले होते. मी उदयनराजे यांना मी सल्ला दिला असता उभे राहू नका म्हणून आधी शशिकांत शिंदे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर उदयनराजे यांचे नाव जाहीर झाले आहे. त्यामुळे दुटप्पीपणा झालेलाच नाही," असे उत्तर जयंतरावांनी फडणवीसांच्या टीकेला दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकेकाळचे दोन शिवसैनिक तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर शनिवारी दिसले. शनिवारी राज ठाकरे यांची कणकवली येथे नारायण राणे यांच्यासाठी प्रचार सभा झाली. राज ठाकरेंनी यांनी राणेंच्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले, "नारायण राणे यांना सहा महिने मुख्यमंत्रीपद मिळालं. त्यांनी ज्याप्रकारे काम केलं, ते भल्या भल्यांना जमलं नाही. अंतूले यांच्यानंतर राणे यांनी खरं वाघाप्रमाणे काम केलं. अंतुलेंनंतर राणे हाच काम करणारा वाघ," "मी कौतूक करायचंच म्हणून बोलत नाहीये, पण मला खरंच प्रश्न पडला होता की नारायण राणे मुख्यमंत्रीपद सांभाळू शकतील की नाही?.. पण त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवले आणि अनेकांना जमलं नाही असं काम त्यांनी केलं," असं म्हणत राज ठाकरे यांनी राणेंची फिरकी घेतली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com