Madha Lok Sabha News : माढा लोकसभा (Lok Sabha election 2024) मतदारसंघात भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी वेगळी भूमिका घेत विरोध केला आहे. रामराजेंची समजूत काढण्यासाठी आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत समाधानकारक तोडगा निघाला नाही. महायुतीचा धर्म पाळावा, या फडणवीसांच्या सूचनेला रामराजेंनी विरोध करत मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेईन, असे सांगितले. त्यामुळे माढ्याचा तिढा बैठकीनंतरही कायम राहिला आहे.
माढा मतदारसंघाबाबत (Madha Constituency) महायुतीत निर्माण झालेला पेच सोडविण्यासाठी आज फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) सागर बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीला फडणवीसांसह अजित पवार (Ajit Pawar), रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar), खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माण, खटावचे आमदार जयकुमार गोरे, संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटणचे माजी नगरसेवक अनिकेतराजे निंबाळकर उपस्थित होते.
सध्या माढा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजितसिंंह नाईक निंबाळकर (Ranjisingh Naik Nimbalkar) यांच्या उमेदवारीवरून पेच निर्माण झाला आहे. भाजपने जरी उमेदवारी जाहीर केली असली तरी फलटणचे राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी या उमेदवारीला विरोध केला आहे. तसेच ही उमेदवारी बदलण्याची मागणी केली आहे, तर दुसरीकडे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांनी माढा लोकसभेतील विविध विधानसभा मतदारसंघातील आमदारांशी संपर्क साधून त्यांचा पाठिंबा मिळविण्यास सुरुवात केली होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांनी मोहिते पाटलांची भेट घेऊन वेगळी भूमिका घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे माढा मतदारसंघात महायुतीतच वाद पेटला होता. यावर तोडगा काढण्यासाठी संकटमोचक म्हणून मंत्री गिरीश महाजन यांनी मोहिते पाटील यांच्याशी चर्चा करुन सर्वसमावेशक तोडगा काढला. पण, रामराजे नाईक निंबाळकर आपल्या मुद्द्यावर ठाम राहिले होते. त्यामुळे हा वाद शमविण्यासाठी आज महायुतीतील नेत्यांची बैठक झाली.
बैठकीत देवेंद्र फडणवीस तसेच इतर नेत्यांनी रामराजेंना महायुतीचा धर्म पाळावा, अशी सूचना केली. त्यावर रामराजेंनी मी याबाबत माझ्या स्थानिक कार्यकर्त्यांशी व माढा लोकसभा मतदारसंघातील समविचारी नेते यांच्याशी चर्चा करून निर्णय घेईन, असे सांगितले. यावरून माढा मतदारसंघातील तिढा सुटला, अशी अफवा काहींनी पसरवली होती. त्यावर रामराजेंनी व्हॉटस॒अप स्टेटस॒च्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेऊ नये, असे म्हटले आहे. त्यामुळे माढा मतदारसंघातील तिढा अद्याप सुटलेला नसल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.