Lok Sabha Election 2024 : ...तर मतदानावर बहिष्कार घालणार; बौद्ध समाजाचा सर्व पक्षांना इशारा, नेमकं कारण काय?

Shirdi Lok Sabha Election 2024 : शिर्डीसह एका कोणत्याही मतदारसंघात बौद्ध समाजाला संधी द्यावी. उमेदवारी न मिळाल्यास मतदानावर बौद्ध समाजाने बहिष्कार घालण्याची तयारी केली आहे.
Shirdi Lok Sabha Constituency
Shirdi Lok Sabha ConstituencySarkarnama
Published on
Updated on

Shirdi Lok Sabha Constituency : शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा पेच दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून येथे उमेदवार निश्चित नसतानाच इतर समाजिक संघटनांकडून मात्र उमेदवारीबाबत दबाव वाढला आहे. शिर्डी मतदारसंघात बौद्ध समाजाच्या उमेदवारालाच संधी द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. राज्यात पाच राखीव मतदारसंघ आहेत. त्यात शिर्डीसह एका कोणत्याही मतदारसंघात बौद्ध समाजाला संधी द्यावी. संधी दिल्यास स्वागत आहे.

परंतु बौद्ध समाजाला (Buddhist community) उमेदवारी न मिळाल्यास मतदानावर बहिष्कार घालण्याची तयारी केली असून, हा बहिष्कार शिर्डीपुरता (Shirdi) मर्यादित राहणार नसून नगर दक्षिणमध्येही समाजाकडून मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा बौद्ध समाजाडून देण्यात आला आहे. बौद्ध समाजाच्या वतीने नगरमध्ये या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेण्यात आली. रिपाइंच्या कवाडे गटाचे सुमेध गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, रिपाइंचे रोहित आव्हाड, काँग्रेसचे सुनील क्षेत्रे, रिपाइंच्या आठवले गटाचे किरण दाभाडे, भीमशक्तीचे संजय जगताप, ऑल इंडिया पॅंथर सेनेचे योगेश थोरात, रिपाइं सेनेचे मेहेर कांबळे, अविनाश भोसले या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या वेळी सुमेध गायकवाड म्हणाले, "शिर्डी लोकसभा मतदारसंघ (Shirdi Lok Sabha Constituency) राखीव आहे. या संघामध्ये बौद्ध समाजाला उमेदवारीबाबत नेहमीच डावलण्यात आले. हा समाजावर अन्यायच आहे. रामदास आठवले (Ramdas Athavale) यांना एकदा उमेदवारी दिली, पण त्यांना याच मतदारसंघात पराभूत करण्यात आले. राज्यात पाच पाच लोकसभा मतदारसंघ राखीव आहेत. या राखीव जागेवर कोणीही बौद्ध समाजाच्या लोकांना उमेदवारी देत नाही, म्हणून आता आम्ही या पाचही मतदारसंघांमध्ये निर्णायक भूमिका घेणार आहोत". राज्यातील महाविकास आघाडी अथवा महायुती असो यांनी उमेदवारी देताना बौद्ध समाजाच्या माणसाला उमेदवारी द्यावी, अन्यथा आम्ही निवडणुकीवर बहिष्कार घालू, असा इशारा गायकवाड यांनी दिला.

शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आमचे अडीच लाख मतदान आहे, तर अशा प्रकारे आमच्याकडे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्येदेखील तेवढेच मतदार आहेत. प्रस्थापित राजकीय पक्षाने बौद्ध समाजाचा विचार न केल्यास आम्ही निवडणुकीवर बहिष्कार घालू किंवा नोटा बटणाचा वापर करू, असेही सुमेध गायकवाड यांनी म्हटलं आहे.

Shirdi Lok Sabha Constituency
MNS- BJP Alliance News : राज ठाकरे आता कुणाची मुलं अंगा-खांद्यावर खेळवणार?

राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे यांनी बौद्ध समाज हा कधीच कोणावर अन्याय करत नाही. कुठल्याही इतर समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात सर्वप्रथम बौद्ध समाज रस्त्यावर उतरतो. या निवडणुकीमध्ये आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत, असं सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

R

Shirdi Lok Sabha Constituency
MNS-BJP Alliance : भाजप कोणत्या तोंडाने उत्तर भारतीयांची मते मागणार? मनसे-भाजप युतीवर काँग्रेसची टीका

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com