Raju Shetti News : "2019 मध्ये कटकारस्थान करून माझा पराभव केला, पण...", राजू शेट्टींचं विधान

Raju Shetti On Eknath Shinde : "मुख्यमंत्री हातकणंगले मतदारसंघात ठाण मांडून बसले होते. तरीही काहीही होणार नाही"
Raju Shetti
Raju Shettisarkarnama

Kolhapur News, 7 May : यंदा माझा विजय निश्चित आहे. 2019 च्या निवडणुकीत कटकारस्थान करून सर्वांनी मिळून माझा पराभव केला, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) हातकणंगले मतदारसंघात ठाण मांडून बसले होते, तरी काहीही होणार नाही, असंही राजू शेट्टी यांनी म्हटलं.

हातकणंगले मतदासंघात महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने ( Dhairyasheel Mane ), महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील-सरूडकर ( Satyajeet Patil Sarudkar ) आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी ( Raju Shetti ) यांच्यात लढत होत आहे. त्यासाठी आज ( 7 मे ) मतदान पार पडत आहे. मतदान केल्यावर राजू शेट्टी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजू शेट्टी म्हणाले, "2019 मध्ये कटकारस्थान करत सर्वांनी मिळून माझा पराभव घडवून आणला. पण, यावेळी आम्ही सावध आहोत. माझा विजय निश्चित आहे. मुख्यमंत्री हातकणंगले मतदारसंघात ठाण मांडून बसले होते. तरीही काहीही होणार नाही."

"मैदानात माझा पराभव कधीच झाला नव्हता. पराभव हा पराभव असतो. त्याला कारणं सांगून चालत नाही. कोणाला शिव्या-शाप देत बसलो नाही. इमानदारीनं काम करत राहिलो. ज्या काही चुका झाल्या होत्या, त्या दुरूस्त केल्या. आता सामान्य जनतेच्या बळावरच मी निवडणुकीला सामोरे जात आहे. ज्यांनी नाकारलं त्यांचं मत आणि मन परिवर्तन केलं आहे. शिस्त पद्धतीनं मतदारसंघात पाच वर्षे पुन्हा बांधणी केली आहे," असं राजू शेट्टींनी म्हटलं.

"शेतकरी वर्गानं सरकारच्या धोरणानुसार मत द्यायला शिकायला हवं. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावं, अशी अपेक्षा आहे. माझ्या 99 वर्षांच्या आईचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे," असा विश्वास राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com