shahu maharaj virendra mandlik
shahu maharaj virendra mandliksarkarnama

Lok Sabha Election 2024 : "राजर्षी शाहू महाराजांना साजेसं कोणतं काम छत्रपती घराण्यानं केलं?" मंडलिकांच्या पुत्राचा हल्लाबोल

Kolhapur Lok Sabha Election 2024 : मंडलिकांच्या पुत्रानं थेट छत्रपती घराण्यावर टीका केल्यानं कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Kolhapur News : कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत ( Kolhapur Lok Sabha Election 2024 ) महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये आरोप-प्रत्यारोपांची जोरदार बॅटिंग सुरू आहे. छत्रपती घराण्यानं प्रचारात आघाडी घेतली असताना मंडलिक कुटुंबीयदेखील मागे राहिलं नाही. संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक ( Virendra Mandlik ) हेसुद्धा रिंगणात उतरले आहेत. यातच शुक्रवारी ( 20 एप्रिल ) कागल विधानसभा मतदारसंघात झालेल्या प्रचारार्थ मेळाव्यात वीरेंद्र मंडलिक यांनी छत्रपती घराण्यावर तोफ डागली. तसेच, शाहू ग्रुपचे अध्यक्ष आणि भाजपचे नेते, समरजितसिंह ( Samarjitsinh Ghatge ) घाटगे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

"राजर्षी शाहू महाराज ( Rajarshi Shahu Maharaj ) यांच्या नावानं एकही उद्योग छत्रपती घराणं काढू शकलेलं नाही. 12 ते 15 वर्षांपासून बंद पडलेली शाहू मिलसुद्धा त्यांना सुरू करता आलेली नाही. पण, छत्रपती घराण्याला साजेस असं काम विक्रमसिंह घाटगे आणि समजितसिंह घाटगे यांनी केलं," असं वीरेंद्र मंडलिकांनी म्हटलं. वीरेंद्र मंडलिकांनी थेट छत्रपती घराण्यावर टीका केल्यानं राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वीरेंद्र मंडलिक ( Virendra Mandlik ) म्हणाले, "छत्रपती कुटुंबानं राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाला साजेसं काम केलं नाही. ते काम जनक घराणे म्हणून स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे आणि समरजितसिंह घाटगे यांनी केलं."

"राजर्षी शाहू महाराज हे आमचे दैवत आहेत. पण, राजर्षी शाहू महाराज यांच्या नावानं एकही उद्योग छत्रपती घराण्यानं सुरू केला नाही. 12 ते 15 वर्षे बंद पडलेली शाहू मिलदेखील छत्रपती घराण्याला सुरू करता आलेली नाही. राजर्षी शाहू महाराज यांचे खरे जनक वारसदार समरजितसिंह घाटगे आहेत," असं मंडलिकांनी म्हटलं.

"स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांनीदेखील राजर्षी शाहू महाराज यांची मूल्य जपली आहेत. त्यांनी शाहू कारखाना सुरू केला. पण, छत्रपती घराण्यानं एक उद्योग शाहू महाराज यांच्या नावानं सुरू केलेला दाखवावा. शाहू कारखान्याचा आदर्श आम्हीही घेतो," असं म्हणत वीरेंद्र मंडलिकांनी छत्रपती घराण्यावर हल्लाबोल केला.

( Edited By : Akshay Sabale )

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com