Solapur, 28 April : पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विश्वासू सहकारी अभिजित पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा असतानाच ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज संध्याकाळी सोलापूरमध्ये भेट घेणार असल्याची माहिती आहे, त्यामुळे आर्थिक नाकेबंदी झालेल्या अभिजित पाटील यांना फडणवीस कशा प्रकारे मदत करतात, याची उत्सुकता आहे.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडे (Vitthal Sugar Factory) राज्य सहकारी बॅंकेचे मुद्दल आणि त्यावरील व्याज असे एकूण ४३० काेटी रुपये थकीत आहेत. या प्रकरणी बॅंकेच्या तक्रारीनुसार कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील (Abhijeet Patil) आणि संचालक मंडळावर गुन्हा दाखल आहे. त्या प्रकरणात पुणे येथील डीआरटी न्यायालयात सुनावणी सुरू होती. डीआरटी न्यायालयाने सुनावणीत कारवाईला दिलेली स्थगिती उठवली आणि राज्य सहकारी बॅंकेने (State Cooperative Bank) विठ्ठल कारखान्यावर जप्तीची कारवाई केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
बॅंकेने कारवाईत विठ्ठल कारखान्याची तीन गोदामे सील केली आहेत. त्या गोदामात तब्बल एक लाख साखर पोती आहेत. तसेच, कारखानाही जप्त केला आहे. विठ्ठल कारखान्यावर जप्तीची कारवाई झाल्याने अध्यक्ष अभिजित पाटील यांची आर्थिक नाकेबंदी झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे पाटील यांनी संचालक मंडळ आणि कार्यकर्त्यांची शनिवारी बैठक घेतली. त्या बैठकीत अभिजित पाटील यांना कारखाना वाचविण्यासाठी निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत.
दरम्यान, त्या बैठकीमध्ये भाजपसोबत जाण्यावरही चर्चा झाली. मात्र, अभिजित पाटील यांनी अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र, आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी अभिजीत पाटील हे आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. फडणवीस हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांची माढ्यातील वाकाव, सांगोल्यात आणि सायंकाळी अकलूजमध्ये सभा होणार आहे, त्यामुळे ही भेट महत्वपूर्ण ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.