Satara Lok Sabha : ...तर साताऱ्याला मिळणार चार खासदार, शशिकांत शिंदे-उदयनराजे भोसलेंच्या लढतीकडे लक्ष

Lok Sabha Election 2024: सातारा लोकसभा मतदारसंघात यावेळेस महायुतीचे उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे अशी तुल्यबळ लढत झाली.
Satara Loksabha
Satara Loksabhasarkarnama

Satara Political News : सातारा लोकसभा मतदारसंघात हायहोल्टेज लढत होत आहे. उदयनराजे भोसले शशिकांत शिंदेंना अस्मान दाखवणार की साताऱ्यात शिंदेशाही चालणार, हे अवघ्या पाच दिवसांमध्ये कळेल. उदयराजे विजयाचा दावा करत आहेत. ते राज्यसभेचे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे जरी ते पराभूत झाले तरी ते राज्यसभेचे खासदार असणार आहेत. मात्र, शिंदे विजयी झाले तर सातारा जिल्ह्याला चार खासदार मिळतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघात यावेळेस महायुतीचे उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे अशी तुल्यबळ लढत झाली. तर, माढा मतदारसंघात समावेश असलेले फलटण विधानसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळक़र यांनाच पुन्हा रिंगणात उतरविले होते. तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील Dhairyasheel Mohite Patil यांच्यात लढत झाली.

Satara Loksabha
Sangli Lok Sabha 2024: सांगलीत गुलाल कुणाचा? दोन्ही पाटलांच्या दाव्याने सट्टाबाजार तेजीत

दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येण्याचे भाकित सर्वजण करत आहेत. पण प्रत्यक्षात मतदारांनी कोणाच्या पारड्यात विजयाची मते दिली आहेत, हे चार जूनला समजणार आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढलेले उदयनराजे भोसले हे भाजपकडून राज्यसभेवर खासदार आहेत. तर दुसरीकडे महायुतीच्या जागा वाटपात सातारची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला येत होती. पण, उदयनराजेंच्या आग्रहाखातर हा मतदारसंघ भाजपला सोडला. तर त्या बदल्यात राज्यसभेची एक जागा अजित पवार यांच्या पक्षाला देण्याचा निर्णय झाला आहे.

त्यानुसार अजित पवार यांच्या गटाकडून जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनाच राज्यसभेवर घेतले जाणार आहे. तसा शब्दही अजित पवार यांनी आमदार मकरंद पाटलांना दिला आहे. त्यानुसार नितीन पाटील हे दुसरे खासदार असतील. तसेच सातारा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे विजयी झाले तर तिसरा खासदार आणि माढ्यातून रणजितसिंह निंबाळकर किंवा धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पैकी एकजण खासदार असेल. त्यामुळे एकुण जिल्ह्याला चार खासदार मिळतील.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यामध्ये राज्यसभेवर असलेले खासदार उदयनराजे भोसले तसेच नितीन पाटील आणि निवडून येणारे दोन खासदार अशी चार खासदारांची बेरीज होणार आहे. लोकसभेच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडणार आहे. त्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत पहायला मिळण्याची शक्यता आहे.

एका खासदाराला वर्षाला पाच कोटी रुपयांचा निधी मिळतो. त्यानुसार चार खासदार जिल्ह्याला मिळाल्यामुळे 20 कोटी रुपयांचा निधी वर्षाला या खासदारांच्या माध्यमातून मिळणार आहे.त्यातुन जिल्ह्याच्या विकासाला आणखीन चालना मिळेल.

(Edited By Roshan More)

Satara Loksabha
Prithviraj Chavan News: महात्मा गांधींबाबत मोदींच्या 'त्या' वक्तव्यावरुन पृथ्वीराज चव्हाण आक्रमक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com