Prithviraj Chavan On Pm Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे नेते आणि राज्याची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. 'महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्यावर चित्रपट आल्यानंतर त्यांच्याबाबत सर्वांना माहिती झाली,' असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं होतं. मोदींच्या या वक्तव्याचा चव्हाणांनी चांगलाच समाचार घेतला. पंतप्रधान मोदींचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, असं म्हणत चव्हाण यांनी हल्लाबोल केला.
पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले, काँग्रेस विरोधात बोलण्यासाठी काही नसल्याने काय वाटेल ते बोलणे सुरु आहे. यामुळे त्यांनी महात्मा गांधी यांच्यावर राग काढला. जगातील महात्मा गांधी यांचे महत्व मोदींना माहिती नाही. शैक्षणिक पार्श्वभूमी नसल्यानेच अशी वक्तव्यं ते करत आहेत. त्यांचे वक्तव्य म्हणजे देशाचे दुर्दैव आहे, पंतप्रधान मोदींचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, अशा शब्दात चव्हाण यांनी मोदींवर टीका केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि करवीर विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार पी. एन पाटील (P. N Patil) यांच्या घरी आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट देऊन कुटुंबियांचे सात्वन केले. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "आमदार पी. एन पाटील निष्ठावंत कार्यकर्ता होते. सहकारात त्यांनी चांगलं कामं केलं, काँग्रेसवाढीसाठी त्यांचे चांगलं काम राहिले आहे.
जेष्ठत्वाने त्यांना मंत्रीपद मिळायाला पाहिजे होते, पण दुर्दैवाने मिळाले नाही. त्यांनी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढवावी अशी आमची इच्छा होती. पण नियतीसमोर कोणाचं काय चालत नाही. लोकसभा निवडणुकीत त्यांनी प्रत्येक गावं पिंजून काढलं आहे. आमचा सहकारी सोडून गेला, महाराष्ट्र राजकारणात सहकारात पोकळी निर्माण झाली आहे."
काँग्रेसकडून (Congress) दुष्काळ दौरा नियोजित करण्यात आला आहे. याबाबत बोलताना चव्हाणांनी सांगितलं, काँग्रेसने विभागवर समिती नेमल्या आहेत. आचारसंहिता असली तरी दुष्काळ थांबणार नाही. आचारसंहिता शिथिल करावी अशी मागणी केली आहे. कराडमध्ये बैठक आहे, त्यानंतर जिल्हावार दौरे सुरू केले जातील अशी माहिती चव्हाण यांनी दिली. दरम्यान, पुणे येथील कल्याणीनगर (Kalyaninagar) येथे घडलेल्या अपघातावर बोलताना चव्हाण यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले. महाराष्ट्रमध्ये भ्रष्टाचारी सरकार कार्यरत आहे. अधिकारी पैसे देऊन खुर्चीवर बसलेत. श्रीमंत लोकासाठी वेगळा कायदा सुरु आहे. पण जनता आता स्वतः न्याय देईल, हे सरकार जनता उलथवून टाकेल, अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.